Hindustani Bhau  Esakal
मनोरंजन

Hindustani Bhau: 'पाकिस्तानी चित्रपट भारतात...!; मनसेपाठोपाठ 'हिंदुस्थानी भाऊ' पुन्हा भडकला, म्हणाला...

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानी चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट' याची सध्या जगभरात चर्चा आहे. भारत आणि पाकिस्तान याच्यांतील संबध हे सर्वश्रूत आहे. या चित्रपटाची भारतात जास्तच चर्चा रंगली आहे. भारतातही 23 डिसेंबरला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करण्यात आली होती, मात्र आता चित्रपट रिलीज होण्याआधीच यावरून महाराष्ट्रातच जोरदार वाद सुरू झाला आहे.

अलीकडेच अमेय खोपकर यांनी शुक्रवारी जाहीर इशारा देत पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा 'द लिजेंड ऑफ मौला जट' हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी दिली आहे. फवाद खानचा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याविषयी अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली त्याच्या समर्थनात आता अनेकजण उभे आहेत.

त्यातच विकास फाटक म्हणजे सोशल मीडियावरील प्रसिद्ध हिंदुस्थानी भाऊ त्यानेही आता या चित्रपटाच्या पदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्याने एक व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केलाय. ज्यात त्याने कोणत्याही परिस्थीतीत फवाद खानचा 'द लिजेंड ऑफ मौला जट' भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही आणि असं झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली आहे.

या व्हिडिओत तो म्हणतोय, "‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. या विरोधात मनसेने आवाज उठवला असून, मी त्यांच्या सोबत आहे. ज्या चित्रपट गृहात चित्रपट लागेल, त्याची जबाबदारी ही त्यांच्या मालकाची असेल. हा नवा भारत आहे, इथे हे चालणार नाही." व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT