Palak Puraswani evicted Bigg Boss ott 2 out of the house SAKAL
मनोरंजन

Bigg Boss OTT 2: मोठी बातमी! बिग बॉस मधून पलक पुरसवानी घराबाहेर?

बिग बॉस ओटीटी सीझन 2 सतत चर्चेत असतो. रिअॅलिटी शो सुरू होऊन फक्त 8-9 दिवस झाले आहेत

Devendra Jadhav

Palak Puraswani evicted Bigg Boss ott 2: बिग बॉस ओटीटी सीझन 2 सतत चर्चेत असतो. रिअॅलिटी शो सुरू होऊन फक्त 8-9 दिवस झाले आहेत. पण घरातील सदस्यांनी निर्मात्यांना मसाला लावण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी 4 जणांचे नॉमिनेशन करण्यात आले होते. ज्यामध्ये बाबिका ध्रुवे, जिया शंकर, अविनाश सचदेव आणि पलक पुरस्वानी यांच्या नावाचा समावेश होता. शनिवार 24 जून रोजी वीकेंड का वार झाला.

यामध्ये सलमानने आकांक्षा पुरीपासून ते आलिया सिद्दीकीपर्यंत सर्वांना फटकारले. पण घर कोण सोडणार हे सांगितले नाही.

(Palak Puraswani evicted Bigg Boss ott 2 out of the house)

यावेळी बिग बॉस ओटीटी 2 मध्ये कोणतीही हकालपट्टी होणार नाही, असे सर्वांना वाटत होते. कारण शोच्या सुरुवातीलाच पुनीत सुपरस्टारला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

त्यामुळे सर्वजण निवांत होते. पण आता पलक पुरस्वानी बेघर झाल्याची बातमी समोर येत आहे. बिग बॉस तक आणि द खबरीनुसार, पलक पुरस्वानी शोच्या पहिल्याच आठवड्यात बाहेर पडली आहे.

पलक पुरस्वानी ही एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक शोमध्ये काम केले आहे. बिग बॉसमध्ये यावे आणि जिंकावे हे तिचे वर्षानुवर्षे स्वप्न होते.

अनेक वेळा निर्मात्यांनी वाइल्डकार्ड म्हणून तिच्याशी संपर्क साधला. पण तिने नकार दिला. कारण तिला पहिल्या एपिसोडपासूनच या रिअॅलिटी शोचा भाग व्हायचं होतं.

ओटीटीच्या बिग बॉसमधून तिला ही संधी मिळाली हे खरे आहे, पण स्वत:ला सिद्ध करण्यात ती कुठेतरी चुकली. आणि लोकांच्या कमी मतांमुळे तिला शोमधून बाहेर काढण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे, नको त्या अवस्थेत सापडले; तरुणी लहान असल्यानं पोलिसांनी ताकीद देत सोडलं, VIDEO VIRAL

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या रेस्टॉरंट अँड बार मध्ये दरोडा

Aadhar Card Updates : आधारकार्ड मध्ये होणार मोठा बदल! नवीन आधार असणार अधिक सुरक्षित! जाणून घ्या काय होणार बदल

विदर्भातही बिबट्याची दहशत! नागपुरातील भांडेवाडी परिसरात वावर, वनविभागाचं पथक दाखल

SCROLL FOR NEXT