Pankaja Munde New Inning, Hosting The Entertainment Award Show. Esakal
मनोरंजन

पंकजा मुंडेंनी राजकारण सोडलं? कलाक्षेत्रातल्या धमाकेदार एन्ट्रीची चर्चा

भाजपा नेत्या पंकजा मुंडे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगली होती.

प्रणाली मोरे

Pankaja Munde New Inning,: झी मराठीच्या(Zee marathi) मंचावर प्रेक्षकांना नेहमी प्रेरणा देणारे कार्यक्रम सादर होत असतात. ह्या वर्षी देखील मला अभिमान आहे हे ब्रीद घेऊन स्त्री कर्तृत्वाचा सन्मान म्हणून ‘उंच माझा झोका' या नेत्रदीपक सोहळयाचे सादरीकरण होणार आहे . 'उंच माझा झोका' पुरस्काराचे यंदाचं हे आठवं वर्ष आहे. आपल्या कार्याने समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात येईल.(Pankaja Munde New Inning, Hosting The Entertainment Award Show.)

ह्यावर्षीच्या पुरस्काराचे खास आकर्षण म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर सांभाळणार आहेत. आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे निवेदन करणार म्हटल्यावर वेगळीच चर्चा रंगलेली दिसून येत आहे.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. त्यांची ही नाराजगी अनेकदा दिसून आली. त्यांच्या समर्थकांकडूनही अनेकदा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केली जात होती,ते नाही तर राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद तरी दिलं जावं अशीगी मागणी करण्यात आली होती. मात्र यापैकी काहीच न घडल्यानं पंकजा मुंडे आपल्या पक्षावर नाराज आहेत हे चित्र आता काहीसं स्पष्ट होत चाललं आहे. त्यामुळे झी च्या एका चॅट शो मध्ये सहभाग घेतल्यानंतर थेट त्या वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याचं चक्क निवेदन करताना पंकजा मुंडे दिसणार असल्यानं आता वेगळ्याच चर्चेला रंग चढला आहे. पंकजा मुंडे राजकारणातून बाहेर पडणार का? मनोरंजन क्षेत्रात रुळणार का? मनोरंजन क्षेत्रात नवी इनिंग सुरु करतायत का? अशा एक ना वारेमाप प्रश्नांची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. आता या सर्व प्रश्नांची उत्तरं पंकजा मुंडेच आपल्याला सांगू शकतील.

पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर ह्या दोघींची जुगलबंदी ह्या कार्यक्रमात रंगत आणेल ह्यात शंकाच नाही. सोबतच कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान आणि कलाकारांचे धमाकेदार नृत्याविष्कार अनुभवता येणार आहे. हा पुरस्कार सोहळा झी मराठी वर २८ ऑगस्टला संध्याकाळी ७ :00 वाजता आपण पाहू शकाल. कदाचित त्याच पुरस्कार सोहळ्यात पंकजा मुंडे आपल्या या नव्या इनिंगविषयी स्पष्ट बोलतानाही दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update: पवईत आढळले दोन अजगर, रेस्क्यू टीम घटनास्थळी

SCROLL FOR NEXT