Taapsee Pannu esakal
मनोरंजन

Taapsee Pannu: असं काय केलं तापसीनं की पत्रकार म्हणाले, 'ओरडू नका'

फॅन्स म्हणाले, ‘हि तर कंगनाची कार्बन कॉपी’

सकाळ डिजिटल टीम

तापसी पन्नू  ही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र तिच आणि  पापाराझींच काही जास्त जमत नसल्याचं चित्र नेहमीच दिसत. ती नेहमी पत्रकारांवर रागवतांना दिसते. नुकतच तिला राजू श्रीवास्तव यांच्यावर प्रतिक्रिया विचारली तेव्हाही ती चांगलीच भडकली होती. तिच्या या वागण्यामुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. मात्र यावेळी ती जरा चांगल्या वागण्याचा प्रयत्न करतांना दिसली.

ती मुंबईत आयुष्मान खुरानाने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत पोहोचली होती. त्यावेळी तेथे पापाराझींही फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी जमा होते. तापसी गोल्डन ब्लाउज आणि लाल रंगाच्या साडीत दिसली. तापसीच्या स्वभावामुळे पापाराझी तिच्यापासुन लांबच होते. मात्र यावेळी तिने कॅमेऱ्यांकडे हसत पोझ दिली आणि तिने पापाराझींसोबत चांगल्या प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

याचा एक व्हिडिओ विरल भयानी यांच्या इंस्टाग्रामला पोस्ट केला आहे. या व्हिडिओत एक कॅमेरामॅन तापसीला तिचे फोटो क्लिक करण्याअगोदरच तिला कृपया ओरडू नका अशी विनंती करताना ऐकू येत. तो म्हणातो, ‘आज ओरडू नका’ त्यावर तापसी त्याला हसत उत्तर देत म्हणते, ‘तुम्ही चुकिचं वर्तन करणार नाही तर मीही ओरडणार नाही’. तिच्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.एकाने कमेंट केलीय की, ‘ हि जया बच्चनची लाइट कॉपी आहे.’ तर एकानं तिची कंगनाशी तुलना केली आहे.

तापसी पन्नूने प्रतीक बब्बर आणि प्रतीक गांधी यांच्यासोबतच्या 'वो लड़की है कहां' या चित्रपटाचे शूटिंग पुर्ण केले आहे. त्याचबरोबर ती शाहरुख खानसोबत पहिल्यांदाच  राजकुमार हिरानी निर्मीत ‘डंकी’मध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT