Parineeti Chopra Post Instagram
मनोरंजन

Parineeti Chopra: 'दोन वेगळ्या जगातील लोक जेव्हा...', साखरपुड्यानंतर परिणीतीची पहिली पोस्ट चर्चेत

अभिनेत्री परिणीती चोप्रानं आप नेता राघव चड्ढा यांच्यासोबत १३ मे रोजी दिल्लीत धूमधडाक्यात साखरपुडा केला.

प्रणाली मोरे

Parineeti Chopra: आम आदमी पार्टीचे नेता राघव चड्ढा यांच्याशी साखरपुडा झाल्यानंतर परिणीती चोप्रा हिची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, अभिनेत्रीनं आज तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की मी आणि राघव गेल्या काही दिवसात आमच्यावर जो प्रेमाचा वर्षाव झाला खासकरुन साखरपुड्याच्या दिवशी आम्हाला जे आशीर्वाद मिळाले यामुळे खूपच खूश आहोत.

परिणीती चोप्रा व्यतिरिक्त राघव चड्ढा यांनी देखील ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ''आम्ही दोघं खूप वेगळ्या क्षेत्राशी संबंध ठेवून आहोत,आणि हे सांगताना आम्हाला अधिक आनंद होत आहे की आमच्यासोबत आमचं जगही आता एकत्र आलं आहे. आम्हाला जे मोठं कुटुंब यामुळे मिळालं आहे ज्याचा आम्ही कधीच विचारही केला नव्हता''. (Parineeti Chopra first post after her engagement with raghav chadha )

राघव आणि परिणीती यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून लोकांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिलं आहे की,''आम्ही गेल्या काही दिवसांत आमच्याविषयी बोललं गेलेलं जे काही वाचलंय..पाहिलं त्याचे आभार आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. तुमच्या आशीर्वादासोबतच आम्ही आमच्या या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहोत''.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा १३ मे रोजी दिल्ली येथील कपूरथला हाऊसमध्ये पार पडला.. परिणीती आणि राघव यांच्या आयुष्यातील या खास दिनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि कपिल सिब्बल यांच्यासोबतच अनेक नेतेमंडळी हजर राहिले होते. परिणीती चोप्राची बहिण हॉलीवूड स्टार प्रियंका चोप्रा,फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा देखील या साखरपुड्यात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT