Parineeti Chopra Got A Grand Welcome With 'Band Baaja' At Raghav Chadha Home In Delhi video viral  Esakal
मनोरंजन

'पंजबियाँ दी बैटरी चार्ज रेह्न्दी है!' ढोल ताशांच्या गजरात परिणीतीचं सासरी जंगी स्वागत...

Vaishali Patil

Parineeti Chopra Got A Grand Welcome: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी 24 सप्टेंबर रोजी उदयपूर येथील हॉटेल लीला पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली आहे. पंजाबी रितीरिवाजांनुसार या जोडप्याचा विवाहसोहळा पार पडला.

लग्नानंतर त्यांनी काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर दोघांच्या लग्नाचे काही अनसीन व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. परी आणि राघव आपल्या आपल्या घरी परतले आहे.

लग्नानंतर परिणीती चोप्रा पती राघव चढ्ढासोबत दिल्लीतील तिच्या सासरच्या घरी आली आहे. येथे तिचे स्वागत करण्यात आले. पिवळा सूट, गुलाबी बांगड्या, सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेली परि नववधूच्या लूकमध्ये खुप सुंदर दिसत होती.

आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नववधू आणि वर म्हणजेच राघव आणि परिचं त्यांच्या दिल्लीतील घरी जंगी स्वागत करण्यात आलं.

त्यांची गाडी दिल्लीतील घरी गेटवर पोहचण्यापुर्वीच गेटवर ढोल वाजवले जात होते. परिणीती - राघव लग्नानंतर त्यांच्या घरी आले. यावेळी राघवचे घर सजवलेलं दिसत असुन दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. सासरच्या मंडळींनी त्याची सून परिणीतीचे जोरदार स्वागत केले. तर एक व्हिडिओत राघव देखील ढोलच्या तालावर नाचाताना दिसला.

तर सोशल मीडियावर परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढाच्या लग्नाचे आणि विधींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. परिच्या फॅन पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये ती वरमालासाठी राघव चड्ढाकडे जाताना दिसत आहे.

तर एका व्हिडिओत राघव आणि परिणीती पांढऱ्या छत्रीसोबत नाचताना दिसत आहेत. राघव आणि परिणीतीच्या लग्नाचा मंडप पूलावर बांधण्यात आला होता. मंडप अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आला होता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

‘धुरंधर’च्या टीमची तब्येत बिघडण्याचं खरं कारण समोर; सेटवरील जेवण नाही तर लेहमध्ये पसरलेलं मोठं फूड कंटॅमिनेशन

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT