Parineeti Chopra,Deepika Padukone
Parineeti Chopra,Deepika Padukone  Instagram
मनोरंजन

Parineeti Chopra Birthday: परिणीतच्या एका नकारानं दीपिका पादूकोणचे चमकलेले तारे.. आजही त्याची अभिनेत्रीला आहे खंत

प्रणाली मोरे

Parineeti Chopra Birthday: परिणीती चोप्राचा आज वाढदिवस. बॉलीवूडमध्ये २०१२ मध्ये 'इश्कजादे' सिनेमातून तिने पदार्पण केलं होतं. परिणीती आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिनं आपल्या करिअरमध्ये दर्जेदार सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या अभिनयाची इंडस्ट्रीत प्रशंसा देखील केली जाते.

'हसी तो फसी' या सिनेमातील तिच्या भूमिकेचं खूप कौतूक झालं होतं. अर्थात तो सिनेमा हिट झाला नव्हता. पण त्यातील तिचा अभिनय भाव खाऊन गेला. पण तुम्हाला माहित आहे का परिणीतीनं तिच्या करिअरमध्ये कितीतरी सुपरहिट सिनेमांना नकार दिला होता.

तिला ऑफर झालेली एक भूमिका अशी होती जर परिणीतीनं ती स्विकारली असती तर तिचं करिअर आहे तिच्यापेक्षा चौपट वेगानं पळालं असतं.(Parineeti Chopra Regret saying no to piku)

बातमीनुसार शूजीत सरकार आपल्या 'पीकू' सिनेमात परिणीती चोप्राला मुख्य भूमिकेसाठी घेऊ इच्छित होता, पण परीनं त्या भूमिकेला नकार दिला कारण त्या दरम्यान ती इतर एका सिनेमात व्यस्त होती. अर्थात या गोष्टीचं दुःख परिणीतीला आजही आहे. पण आता त्याचा पश्चाताप करून काहीच उपयोग नाही.

परिणीतीनं नाही म्हटलं म्हणून शूजीत सरकारची दुसरी पसंत बनली दीपिका पदूकोण आणि त्यांनी 'पीकू' दीपिकाला ऑफर केला. तेव्हा दीपिकानं एका फटक्यात होकार कळवला कारण तिला सिनेमाची कथा आवडली होती.

माहितीसाठी सांगतो की 'पीकू' सिनेमा हीट झाला होता,आणि दीपिकानं आपल्या जबरदस्त अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकली होती. दीपिकाच्या बेस्ट सिनेमांपैकी 'पीकू' एक आहे.

पीकू सिनेमात दीपिका पदूकोण व्यतिरिक्त अमिताभ बच्चन,इरफान खान मुख्य भूमिकेत होते. दोन्ही स्टार्सनी सिनेमात कमाल अॅक्टिंग केली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे कुणताच बडा तामझान नसताना ,ग्लॅमरची रंगरंगोटी नसताना हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Khadse: "मी निवडणूक लढवणार नाही, पंरतू..." राजकीय संन्यासाबाबत एकनाथ खडसे थेटच बोलले

Dirty act in Restaurant: ईईई.. जेवणातील खाद्यपदार्थांवर घासायचा गुप्तांग अन् करायचा लघवी! मोठ्या हॉटेलमधील वेटरचं किळसवाणं कृत्य

Pig Kidney Transplant: शरीरात डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू; दोन महिन्यांपूर्वी झाली होती ऐतिहासिक शस्त्रक्रिया

Rohit Sharma : KKRच्या ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माची सीक्रेट मीटिंग? अफवांच्या बाजारात चर्चांना उधान

HRA Claim: वडिलांना मिळालेल्या सरकारी घरात राहणाऱ्या कर्मचाऱ्याला एचआरए मिळू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT