parineeti raghav wedding pics priyanka chopra give blessing and comment on photo nick jonas  SAKAL
मनोरंजन

Parineeti - Raghav Wedding: बहिणीच्या लग्नाला गैरहजर, प्रियंका चोप्राने लाडक्या परिला दिल्या शुभेच्छा, म्हणाली...

लाडक्या बहिणीच्या लग्नाला प्रियंका गैरहजर होती, पण तिने या खास अंदाजात शुभेच्छा दिल्यात

Devendra Jadhav

Parineeti - Raghav Wedding News: काल २४ सप्टेंबरला परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा या दोघांनी लग्न केलं. थाटामाटात आणि भव्यदिव्य पद्धतीने या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाच्या फोटोंवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

परिणीती चोप्राच्या लग्नाला तिची लाडकी बहिण अभिनेत्री प्रियंका चोप्रा गैरहजर होती. लाडक्या परिच्या लग्नाला उपस्थित राहिली नसली तरीही सोशल मिडीयाच्या माध्यमातुन प्रियंकाने बहिणीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

परिणीतीला शुभेच्छा देताना प्रियंका म्हणाली...

परिणीती आणि राघवच्या लग्नाचे पहिले फोटो समोर आल्यानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. परिणीतीची चुलत बहीण प्रियांका चोप्रानेही परिणीती-राघवच्या लग्नाच्या फोटोंवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रियंका चोप्राने लिहिले की, "माझे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहेत." हे लिहीतानाच प्रियंकाने आनंदाश्रू आणि हार्टचे इमोजी पोस्ट केलेत.

प्रियंका बहिणीच्या लग्नाला का उपस्थित राहू शकली नाही

परिणीती आणि राघवच्या लग्नाला प्रियंका उपस्थित राहू शकली नाही. मात्र, मे महिन्यात झालेल्या या जोडप्याच्या एंगेजमेंट फंक्शनला अभिनेत्री हजेरी लावली होती. प्रियंकाची आई मधू चोप्राने परिणीती आणि राघवच्या लग्नाचा खूप आनंद लुटला.

दरम्यान, प्रियंकाची आई सोमवारी सकाळी उदयपूर विमानतळावर दिसली, तेव्हा मिडीयाने त्यांना प्रियंका चोप्राच्या लग्नात अनुपस्थितीबद्दल विचारले. यावर अभिनेत्रीच्या आईने खुलासा केला की, “ती कामात व्यस्त आहे.” एकूणच प्रायर वर्क कमिटमेंट्समुळे प्रियंका परिच्या लग्नाला उपस्थित राहू शकली नाही.

परिणीती - राघव अखेर लग्नबंधनात

परिणीती चोप्रा ही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री. तर राघव चढ्ढा हे आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार. एक दिग्गज राजकारणी तर दुसरी लोकप्रिय अभिनेत्री. प्रोफेशन जरी विरुद्ध असलं तरी प्रेमाच्या धाग्याने या दोघांना एकत्र आणलं. परिणीती आणि राघव या दोघांनी २४ सप्टेंबरला थाटामाटात एकमेकांशी लग्न केलं.

परिणीती - राघवच्या लग्नसोहळ्याला आदित्य ठाकरे, आप प्रमुख अरविंद केजरीवाल आणि इतर राजकारणी आणि सेलिब्रिटी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

Devendra Fadnavis : 'जो राम का नही, ओ किसी काम का नही'; नाशिकच्या सभेत फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

Who is Mini Kohli ? विराट कोहलीसारखा दिसणारा 'तो' चिमुकला आहे तरी कोण? रोहितही म्हणालेला, विराट, बघ, तुझा डुप्लिकेट!

Nagpur Crime: नागपूरात ‘न्यूरो ट्रेड’च्या नावाखाली १५.३७ लाखांचा गंडा; व्यावसायिकाची सायबर चोरट्याकडून फसवणूक !

SCROLL FOR NEXT