Pakistani singer Ali Sethi breaks silence on wedding rumours with Salman Toor Esakal
मनोरंजन

Ali Sethi Reacts On Marriage: 'माझं सलमानसोबत लग्न..', अखेर 'पसूरी' फेम गायकानं केला मोठा खुलासा..

गायक अली सेठीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना याबद्दल माहिती दिली.

Vaishali Patil

Pakistani singer Ali Sethi breaks silence on wedding rumours with Salman Toor: 'पसूरी' या लोकप्रिय पाकिस्तानी गाण्याने भारतात देखील जादू पसरवली. या गाण्याची क्रेझ तरुणाईमध्ये खुप मोठ्या प्रमाणात होती. या गाण्याचा गायक अली सेठी याचं देखील खुप कौतुक करण्यात आलं होतं.

त्यातच अचानक प्रसिद्ध गायक अली सेठी पुन्हा चर्चेत आला आणि त्यामागचं कारण अलीचं कोणतेही हिट गाणं नसून त्याच्या लग्नाची बातमी होती. त्याने लग्न केलं अशा चर्चा वेगाने पसरल्या आहेत

त्याने न्यूयॉर्कमध्ये सह कलाकार सलमान तूर सोबत समलैंगिक विवाह केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर सगळीकडे विशेषतः पाकिस्तानात खळबळ उडाली होती. त्याला ट्रोल केलं जावू लागलं मात्र आता वाढता विरोध आणि ट्रोलिंगमुळे सिंगरने आता सोशल मीडियावरील पोस्ट शेयर करत या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे.

Pakistani singer Ali Sethi breaks silence on wedding rumours with Salman Toor

गायक अली सेठीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना याबद्दल माहिती दिली. त्यानं स्टोरीत लिहिलं की, 'मी अजून लग्न केलेले नाही. ही अफवा कोणी पसरवली आहे हे मला माहीत नाही. या पोस्टबरोबरच त्याने अनेक अफवा पसरवणाऱ्या लोकांना मौन केलं आहे.(Latest Marathi News)

अली सेठी बद्दल बोलायचं झालं तर तो एक लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार आहे त्याचबरोबर त्याने अनेक गाणी लिहिली देखील आहेत. त्याची गाणी केवळ पाकिस्तानातच नव्हे तर भारताबरोबर एतर देशांतही लोकप्रिय आहेत.

अली सेठी याआधीही लैंगिकतेविषयी खळबळजनक खुलासा केला होता आणि समलैंगिकतेबद्दल देखील त्याने वक्तव्य केली आहेत. त्यामुळे आता या बातमीने अनेकांनी अलीला सेठीला ट्रोल केलं. यावर अलीनं लग्न न केल्याचा खुलासा केला आहे.

तर अलीनं कोणाशी लग्न केलं आहे याच्याही चर्चा रंगल्या होत्या. तो व्यक्ती आहे त्याचा जवळचा मित्र सलमान तूर. सलमान हा पाकिस्तानात जन्मलेला आहे मात्र आता तो न्यूयॉर्कमध्ये राहतो. तो एक अमेरिकन चित्रकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT