Pathaan Esakal
मनोरंजन

Pathaan: 'तिला' नाही आवडला शाहरुखचा 'पठाण'! शाहरुख म्हणाला, 'प्लिज...' तर रेणुका शहाणेंना सांगितलं

शाहरुख खानने पुन्हा एकदा आपल्या स्टाईलने सर्वांची मने जिंकली आहेत. पण एका लहान मुलीला पठाण आवडला नाही तेव्हा किंग खान म्हणाला...

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान याने 4 वर्षानंतर बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज पुनरागमन केलं. त्याच्या 'पठाण' चित्रपटाने प्रेक्षकांना तर पार वेड केलं आहे. थिएटर्सपासून बॉक्स ऑफिसपर्यंत 'पठाण'ची दमदार कामगिरी सुरू आहे. कलेक्शनच्या बाबतीत, चित्रपटाने दंगललाही मागे टाकले आहे आणि देशातील सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट बनला आहे.

सर्वांनावरचं पठाणने भुरळ घातली आहे. थिएटरमधून बाहेर आल्यानंतर सर्वच प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरुन कौतुक करत आहेत, मात्र एका लहान मुलीला हा चित्रपट आवडला नाही. खरं तर, एका तरुणाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्या लहान मुलीला विचारतो, 'कोणता पिक्चर पाहिला अहाना ?' यावर ती 'पठाण' असे उत्तर देते. पण तिला पठाण आवडला का असे विचारल्यावर ती 'नाही' म्हणते.

यानंतर तरुणाने का विचारले आणि व्हिडिओ संपला. हा व्हिडिओ शेअर करताना शाहरुख खानला टॅग करण्यात आले आहे.

या व्हिडिओवर शाहरुख खानने आता एक मजेशीर उत्तर दिले आहे, ज्याला सोशल मीडिया यूजर्सकडून पसंती मिळत आहे. किंग खानने लिहिले, 'अरे ओह...!! तुम्हाला अजून जास्त प्रयत्न करावे लागतील. ड्रॉइंग बोर्डकडे परत आलो. तरुण प्रेक्षकांना निराश करू शकत नाही. शेवटी हा देशातील तरुणांचा प्रश्न आहे कृपया DDLJ ट्राय करुन पहा, कदाचित ती रोमँटिक असेल...मुलांना आपण ओळखू शकत नाही.'

तर दुसरं ट्विट हे रेणूका शहाणे यांनी 'पठाण' चित्रपट बघण्यास जात आहोत असं सांगितलं आणि त्यांनतर त्याला ही शाहरुखने रिप्लाय दिला आहे. यात शाहरुख म्हणतोय, 'कर्नल लुथराजी यांना तुम्ही सांगितलं की, तुम्ही माझ्या चित्रपटातील पहिल्या अभिनेत्री होतात. किंवा आपण हे एक टॉप सीक्रेट ठेवावं अन्यथा ते मला एजन्सीमधून काढून टाकू शकतात'

पठाण' बद्दल बोलायचे तर हा चित्रपट सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT