Pathaan Trailer Release Google
मनोरंजन

Pathaan Trailer: शाहरुखची शरणागती.. ट्रेलर मधनं गायब दीपिकाची भगव्या रंगाची बिकिनी

गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यात दीपिकानं घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरनं देशभरात वादाचा वणला पेटला होता.

प्रणाली मोरे

Pathaan Trailer: अखेर ज्या दिवसाची शाहरुखचे सगळेच चाहते वाट पाहत होते तो दिवस आला ...'पठाण'चा ट्रेलर रिलीज झाल्यानं आता किंग खानचे चाहते भलतेच खूश आहेत.

लालबुंद डोळे, लांब केस आणि चेहऱ्यावर जबरदस्त तेज घेऊन शाहरुख खान आपल्या 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर २५ जानेवारी रोजी दणक्यात कमबॅक करत आहे. (Pathaan trailer release bhagwa bikini controversy)

सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या समोर आला आहे. चाहत्यांना जे हवं होतं अगदी तसंच पठाणचं रुप शाहरुखने दाखवलं आहे. केवळ शाहरुखच नाही तर यावेळी दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहमने देखील मन जिंकलं आहे. ट्रेलरमध्ये डिंपल कपाडियांचा डॅशिंग लूकही पहायला मिळत आहे. आणि आशुतोष राणाची तर बातच वेगळी.

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

पण आपण जर ट्रेलर नीट पाहिला असेल तर एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल तर दीपिकाच्या ज्या भगव्या रंगाच्या बिकिनी वरुन वादाचा वणवा पेटला होता..ती बिकिनीच ट्रेलरमधून गायब झालेली दिसतेय. केवळ पिवळ्या रंगाच्या बिकिनीत दीपिका पदूकोण नजरेस पडतेय. कुठे ना कुठे हे बोललं जात आहे की आता कदाचित निर्मात्यांना कुठल्याही वादात फसायचं नाही.

'पठाण' सिनेमातील बेशरम रंग गाणं जेव्हा रिलीज झालं होतं तेव्हा दीपिका पदूकोण भगव्या रंगाची बिकिनी घालून शाहरुख सोबत रोमान्स करताना दिसली होती.

सुरुवातीला मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरनं वाद छेडला होता. त्यांनी संपूर्ण गाण्यावर टीका करत म्हटलं होतं की हे तरुण पिढीला बिघडवायचं काम सुरु आहे. त्यांनी दीपिकाच्या 'बेशरम रंग' गाण्याला सिनेमातून हटवण्याची मागणी केली होती. आणि जर निर्मात्यांनी असं केलं नाही तर सिनेमा मध्यप्रदेश मध्ये प्रदर्शित केला जाणार नाही अशा धमकीवजा इशाराही दिला होता.

त्यानंतर विश्व हिंदू परिषद,वीर शिवाजी संघटनांनी देखील यावर विरोध दर्शवला होता. यानंतर मुस्लिम पक्ष आणि आरटीआयचे कार्यकर्ते दानिश खान यांनीही या वादात उडी घेतली होती. एवढंच नाही तर हे प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचलं होतं. सेन्सॉर बोर्डानं देखील सिनेमात काही बदल सुचवले होते.

सिनेमाच्या ट्रेलरवर एक नजर टाकलीत तर दीपिका पदूकोण तुम्हाला अॅक्शन पॅक्ड अंदाजात दिसेल. व्हाइट रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि ऑरेंज रंगाच्या सारॉन्ग मध्ये दीपिका अॅक्शन करताना दिसत आहे.

पण या ट्रेलरमध्ये 'बंशरम रंग' गाण्याचे आणि त्यातील भगव्या रंगाच्या बिकिनीचे कुठेच दर्शन घडत नाहीय. दीपिका पिवळ्या रंगाच्या बिकिनीत ट्रेलरमध्ये दिसत आहे. दीपिका या बिकिनी लूकमध्ये दिसतेय मात्र एकदम कडक...

सिनेमाच्या ट्रेलरची ओपनिंग होते दुबईच्या बूर्ज खलिफावरनं. जॉन अब्राहम तेवढ्यात मोठ्या गाडीवर अटॅक करुन तिला उडवाताना दिसत आहे. चेहऱ्यावरनं मास्क हटवतो आणि तेवढ्यात बॅकग्राऊंडला ऐकू येतो डिंपल कपाडियाचा दमदार आवाज.

हे पाहिल्यावर लागलीच रोहित शेट्टीच्या सिनेमाचा फिल येतो हे मात्र तितकंच खरं आहे. पठाण सिनेमात शाहरुखची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या चाहत्यांना आता खूप आशा लागून राहिल्या आहेत. तब्बल ४ वर्षांनी शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT