Pati Patni Aur Woh hindi movie trailer released  
मनोरंजन

Pati Patni Aur Woh : बायको-प्रेयसीला सांभाळताना चिंटूची तारेवरची कसरत

वृत्तसंस्था

बॉलिवूडमध्ये रिमेकचं वारं सध्या जोरदार वाहतंय. याचच एक उदाहरण म्हणजे 'पती पत्नी और वो'! कालच (ता. 3) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या चित्रपटात कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असेल. 

कार्तिक म्हणजेच चिंटूची गोष्ट सांगणारा ही ट्रेलर... चिंटू वेदिकाशी (भूमी पेडणेकर) लग्न करतो. त्यांचा संसार सुरू होता. पण काही वेळातच चिंटूच्या आयुष्यात तपस्या (अनन्या पांडे) त्याच्या आयुष्यात येते. तो तिच्या प्रेमात पडतो, मग पुढे त्याची तारेवरची कसरत सुरू होते. पत्नी आणि प्रेयसी यांच्यामध्ये त्याचा गोंधळ उडतो. तो यातून कसा मार्ग काढतो, दोघींना कसा खूश ठेवतो यावर बेतलेली या चित्रपटाची कथा असेल.

ट्रेलर रिलीज झाल्याच्या काही वेळातच या ट्रेलरने सोशल मीडियावर धूम उडवली आहे. एकाच दिवसात या ट्रेलरला 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 1987 मध्ये आलेल्या 'पती पत्नी और वो' या चित्रपटात संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाची मूळ कथा तशीच ठेवून त्याला मॉडर्न ट्विस्ट देऊन हा चित्रपट दिग्दर्शक मुदस्सर अजीज घेऊन येत आहेत. 6 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Loan EMI: दिलासादायक बातमी! गृह आणि कार कर्जाच्या ईएमआयवर मोठी सवलत मिळणार; 'या' बँकेची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत आचारसंहितेच्या काळात १६.१६ लाखांची रोख रक्कम जप्त

Saving Scheme : सरकारी हमीची सुरक्षित गुंतवणूक योजना! मिळेल ८२,००० रुपये व्याज आणि १.५ लाखांची करसवलत

जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, प्रलंबित बदली प्रक्रिया लवकरच सुरू होणार, तीन वर्षांची प्रतीक्षा संपणार?

Thane Politics: काँग्रेसला जबर धक्का! ११ नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी, भाजपात दाखल

SCROLL FOR NEXT