Kuku Kohli Opens up on extra marital affair with Aruna Irani;  Google
मनोरंजन

अरुणा ईराणीशी अफेअर-फसवून लग्न...; 'फूल और कांटे' दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

काही महिन्यांपूर्वी अरुणा ईराणी यांनीही आपले पती दिग्दर्शक कुकू कोहली यांच्या सोबतच्या त्यांच्या नात्यविषयीचं खळबळजनक सत्य सांगितलं होतं.

प्रणाली मोरे

ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईराणी(Aruna Irani) यांनी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. अभिनेत्री,सहअभिनेत्री,खलनायिका,चरित्र भूमिका अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर साकारुन चाहत्यांचं मन जिंकलं आहे. छोटा-मोठा पडदा,हिंदी सोबतच मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्येही काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी अरुणा ईराणी यांनी आपले पती दिग्दर्शक कुकू कोहली(Kuku Kohli) यांच्या विषयी धक्कादायक खुलासा केला होता.(Phool Aur Kaante director Kuku Kohli Opens up on extra marital affair with Aruna Irani)

त्या म्हणाल्या होत्या,''१९९० मध्ये त्यांची भेट कुकू कोहली यांच्याशी सिनेमाच्या सेटवर झाली. प्रेम झालं आणि लग्न केलं. पण आपल्या लग्नाविषयी-पतीविषयी कधीच कुठे का बोललो नाही याविषयी स्पष्टिकरण देताना त्या म्हणाल्या होत्या, माझ्या नवऱ्याचं पहिलं लग्न झालं आहे,त्याला एक मुलगी आहे हे त्यानं माझ्यापासून लपवून ठेवलं होतं. पण आता मी हे सगळं बोलतेय कारण त्याची पहिली पत्नी आता हयात नाही. काही महिन्यांपूर्वी तिचं निधन झालं आहे''.

अरुणा ईराणी यांच्या त्या मुलाखतीनंतर आता दिग्दर्शक कुकू कोहलीनं यावर बोलताना म्हटलं आहे की,''आमच्या इंडस्ट्रीत अनेक कलाकार,दिग्दर्शक,निर्मात्यांची दोन लग्न होतात. हे खूप स्वाभाविक आहे. आम्ही एकत्र काम करतो,विचार शेअर करतो अन् त्यातून प्रेम होतं,लग्न होतात''.

कुकू कोहली यांनी अरुणा ईराणी सोबत लग्न केल्यावर आपण एकत्र रहायचो. त्यावेळी दोन घरं सांभाळणं कठीण गेलं नाही,पण खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागायच्या असं देखील नमूद केलं. मुलाखतीत कुकू कोहलींना विचारलं गेलं की,'अरुणा ईराणींना तुमच्या कुटुंबानं स्विकारलं होतं का?' तेव्हा ते म्हणाले ,'तशी कधी गरज पडली नाही'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

BEST Bus: रक्षाबंधनसाठी 'बेस्ट'ची मोठी भेट, मुंबईत १३६ जादा गाड्या चालवण्याचे नियोजन

Nashik Shalarth Scam: शालार्थ घोटाळ्याची ‘कागदपत्रे’ पोलिसांच्या रडारवर; ८२१ शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांची शहानिशा

Marathi News Live Updates : नोंदणीकृत टूर गाईड्सशी संपर्क साधण्यात आला आहे - सचिन अहिर

Ratnagiri Jan Suvidha: ‘जन’सह ‘नागरी’ सुविधांचा वेग वाढला निविदा-वर्कऑर्डर प्रक्रियेला गती; हजारावर कामे पूर्ण

SCROLL FOR NEXT