Photo gets viral of Kriti Senon Pregnant  
मनोरंजन

क्रिती सेनन प्रेग्नंट? फोटो बघाच!

वृत्तसंस्था

'बरेली की बर्फी'मध्ये झळकलेली क्रिती सेनन सध्या तिच्या अभिनयामुळे चांगलीच चर्चेत असते. नुकतंच 'हाऊसफुल्ल 4' मध्ये तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती. सोशल मीडियावरच्या तिच्या हटके पोस्टमुळेही ती अनेकदा चर्चेत असते. अशाच प्रकारे सध्याही ती चर्चेत आहे, ते एका फोटोमुळे! या फोटोत ती प्रेग्नंट दिसत आहे, त्यामुळे ती लवकरच आई होणार का अशा चर्चांना उधाण आलंय.

सध्या अनेक अभिनेत्री लग्न करू संसार थाटायच्या तयारीत आहेत. काहींना तर मुलंही झाली आहेत. करिअरच्या महत्त्वाच्या वळणावर असताना क्रिती सेनन प्रेग्नंट आहे का, अशी शंका सर्वांना येऊ लागली आहे. पण ही शंका आहे की ती खरंच प्रेग्नंट आहे यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. पण या शंकांना पूर्णविराम द्या.. कारण हा फोटो तिच्या आगामी चित्रपटातील आहे. क्रिती लवकरच 'मिमी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती गरोदर स्त्रीची भूमिका साकारत आहे. पण हास फोटो व्हायरल झाल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

मिमी हा चित्रपट सरोगसी विषयावर आधारित आहे. या चित्रपटात ती एका महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी तिने १५ किलो वजन वाढविले आहे. या चित्रपटात सुप्रिया पाठक, संजय त्रिपाठी आणि मनोज पाहवा हे ही महत्त्वपूर्ण भूमिकेत असतील.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT