Pratik Gandhi & Patralekha In 'Phule' Movie
Pratik Gandhi & Patralekha In 'Phule' Movie Google
मनोरंजन

प्रतिक गांधी व पत्रलेखा अभिनीत बहुचर्चित 'फुले' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

प्रणाली मोरे

न्यू एज प्रोडक्शन हाऊसेस 'कंटेंट इंजिनीयर्स' आणि 'डान्सिंग शिवा प्रोडक्शन्स'च्या वतीने प्रतीक गांधी(Pratik Gandhi) आणि पत्रलेखा(Patralekha) अभिनीत, अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित 'फुले' या मेगा बायोपीकचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला आहे . काळाच्या पुढची दृष्टी आणि दृष्टिकोन असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि समाज सुधारक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटासाठी प्रतीक-पत्रलेखा एकत्र आले आहेत. या हिंदी सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शक राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक अनंद नारायण महादेवन यांनी केले आहे.

महात्मा फुले यांच्या १९५व्या जयंतीचे औचित्य साधत आज 'फुले' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. प्रतीक आणि पत्रलेखा या दोघांमध्येही ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याशी विलक्षण साम्य असल्याने 'फुले'चा फर्स्ट लुक उत्सुकता वाढवणारा आहे. अस्पृश्यता आणि जातीव्यवस्थेच्या विरोधात सक्रियपणे लढा पुकारत समाज सुधारकाच्या रूपात कार्य करणाऱ्या ज्योतिबा फुले यांनी मागासवर्गीय जनतेला समान हक्क मिळावून देण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यासोबतच सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले हे दाम्पत्य स्त्री शिक्षणाचे प्रणेतेही होते.

फुले'बाबत खूपच उत्सुक असलेला प्रतीक म्हणतो, "महात्मा फुलेंचा वारसा जगासमोर आणणे हा खरा सन्मान आहे. 'फुले' हा माझा पहिलाच चरित्रात्मक सिनेमा असल्याने आव्हाने खूप मोठी असली तरी, ते प्रेरणादायी भारतीय नेते असल्याने ही भूमिका स्वप्नवत आहे. याची सुरुवात करण्यासाठी मी फार प्रतीक्षा करू शकत नाही. मला आठवते की या सिनेमाचे कथानक ऐकल्यावर मी लगेच होकार दिला होता. काही कॅरेक्टर्स तुम्हाला शोधत येतात''.

पत्रलेखानेही या बहुचर्चित सिनेमाबाबत आपले विचार व्यक्त केले. ती म्हणाली, "मी शिलाँग, मेघालय येथे लहानाची मोठे झाले, जिथे मातृसत्ताक समाजाचा अभिमान असल्याने लैंगिक समानता माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. सावित्रीबाईंनी पती ज्योतिबांच्या साथीने १८४८मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली स्वदेशी शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहालाही प्रोत्साहन दिले. भ्रूणहत्या रोखण्यासाठी दोघांनी एकत्रितपणे अनाथाश्रम स्थापन केले. त्यामुळेच हा एक असा चित्रपट आहे जो संपल्यानंतरही माझ्यासोबत कायम राहील."

लेखक, अभिनेते, दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी 'मी सिंधुताई सपकाळ' या गाजलेल्या बायोपिकद्वारे आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. 'फुले' सिनेमाबाबत मनोगत व्यक्त करताना अनंत महादेवन म्हणाले, "आपल्या देशात अशा अनेक प्रेरणादायी कथा आहेत, ज्या अद्याप कधीही समोर आलेल्या नाहीत किंवा काही कारणास्तव इतिहासकारांनी त्या दडवून ठेवल्या आहेत. आजवर प्रकाशझोतात न आलेल्या अशा नायकांना तरुण पिढीशी जोडण्याचा सिनेमा हा एक उत्तम मार्ग आहे. ज्योतिबा आणि सावित्री फुले हे भारतातील सामाजिक क्रांतीचे मशाल आहेत. मी या सिनेमासाठी यापेक्षा चांगली कलाकार आणि टीम जमवू शकलो नसतो."

'फुले'मध्ये प्रतीक गांधी आणि पत्रलेखा मुख्य भूमिकेत असून, दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन यांनी केले आहे. डॅा. राज किशोर खवाडे, प्रणय चोक्षी, सौरभ वर्मा, उत्पाल आचार्य, अनुया चौहान कुडेचा आणि रितेश कुडेचा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. २०२३मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT