Pirticha Vanva Uri Petla marathi serial on colors marathi get wrong message netizens said boycott  sakal
मनोरंजन

Pirticha Vanva Uri Petla: बंद करा सिरियल! कलर्स मराठीच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक भडकले..

चोरी करण्याचे समर्थन केल्यावरून मालिका सुरू होण्याआधीच वादात अडकली..

सकाळ डिजिटल टीम

colors marathi serial: सध्या कलर्स मराठीवर नवीन मालिकांची मेजवानी सुरू आहे. एकास एक नवीन विषय घेऊन कलर्स मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वीच वाहिनीने 'शेतकरीच नवरा हवा..' ही आगळी वेगळी मालिका सुरू केली. अशाच दोन मालिका 'रमा -राघव' आणि 'पिरतीचा वणवा उरी पेटला' सध्या प्रक्षेपणाच्या तयारीत आहेत. आहेत त्यापैकी एक मालिका म्हणजेच 'पिरतीचा वनवा उरी पेटला' ही सुरू होण्याआधीच बंद करा आधी मागणी प्रेक्षकांनी केली आहे.

(Pirticha Vanva Uri Petla marathi serial on colors marathi get wrong message netizens said boycott )

'पिरतीचा वनवा उरी पेटवा' ही मालिका येण्याआधीच मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले आहेत. या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी रिलीज झाला, यामध्ये दाखवण्यात आले आहे की, एक श्रीमंत बाई बॅग भरून पैसे घेऊन बँकेच्या बाहेर येते आणि आपल्या गाडीत ठेवते. त्याचवेळी एक मुलगी म्हणजे मालिकेतील नायिका त्या बाईला फसवून त्या पैशांची चोरी करते आणि तो चोरिचा पैसा गावच्या मुलांच्या हितासाठी उपयोग करणार आहे असेही सांगते.. 'आपण चोरी नाही करत,आपण लेव्हल करतो.. समाजात बॅलेन्स राहिला पाहिजे' असे तिचे ब्रीद आहे. यावरूनच आता प्रेक्षकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.

प्रेक्षकांनी या प्रोमोवर नकारात्मक मत मांडले आहेत. "या असा सिरीयल मधुन समाजात गुन्हेगारीच प्रमाण अजून वाढणार..", " चोरी ती चोरीच असते त्यातून घेतलेला पैसा हा गुन्हा असतो..", " अशा चोरिच्या पैशाने शिक्षण नाही तर गुन्हागारी शिकवली जात आहे" अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत.

एवढेच नाही तर.. "कलर्स मराठी अशा सिरीयला प्रोत्साहन देऊन समाजात चुकीचा संदेश देत आहेत''असेही म्हंटले आहे. ''काही लोकांना तर मालिकेच नाव आणि मालिकेची कथा यातील फरक काय काही समजत नाही'' असेही म्हंटले आहे. कलर्स मराठी वाहिनी 'जय जय स्वामी समर्थ', 'योग योगेश्वर जय शंकर', 'बाळु मामाच्या नावानं चांगभलं' यांसारख्या आध्यात्मिक आणि 'सुंदरा मनामध्ये भरली', 'शेतकरीच नवरा हवा', 'भाग्य दिले तु मला'अशा दर्जेदार मालिकांमुळे चर्चेत असतानाच या नव्या मालिकेमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT