PM Modi Mother Heeraba Demise : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांचे वार्धक्यानं निधन झाले. यावर देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी मोदींच्या मातोश्रींना आदरांजली वाहिली. यात जगभरातील अतिमहत्वाच्या व्यक्तींचाही समावेश होता. बॉलीवूडच्या स्टार्सनं देशील श्रद्धांजली वाहिली होती. Shah Rukh Khan- Salman Khan Tweet on Heeraben Demise
यासगळ्यात बॉलीवूडचे दोन दिग्गज अभिनेते ट्रोल झाले आहेत. त्यामध्ये एक आहे बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि दुसरा आहे बॉलीवूडचा भाईजान सलमान खान. यांनी उशिरानं मोदींच्या मातोश्रींना आदरांजली वाहिल्यानं नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर तर शाहरुख आणि सलमानवर नेटकऱ्यांनी आगपाखड केली आहे. त्यांना लाज कशी वाटत नाही का असे प्रश्न विचारले आहेत.
Also Read - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक
शाहरुख आणि सलमाननं ट्विट करुन मोदींप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. त्यामुळे मात्र भाजपच्याच काही नेत्यांनी शाहरुख-सलमानवर टीका केली आहे. आपण कोणत्या देशात राहतो, त्या देशामध्ये काय सुरु आहे याचे जराही भान तुम्ही ठेवायला मागत नाही. यावरुन त्यांना पदाधिकाऱ्यांनी चांगलचे खडसावले आहे. एकानं तर तुम्ही ज्या देशाचे खाता त्याच देशातील महत्वाच्या गोष्टी कशा काय विसरता, असे म्हटले आहे.
यापूर्वी बॉलीवूडमधील खिलाडी अक्षय कुमार, प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, कंगना रनौत, स्वरा भास्कर, अनुपम खेर यांनी मोदींच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र सलमान आणि शाहरुखनं उशिर केल्यानं नेटकऱ्यांनी त्यांना जोरदारपणे ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
पठाणचा अभिनेता शाहरुख खाननं आज ट्विट करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. मोदीजी मी आपल्या मातोश्रींप्रती श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या परिवारातील आम्ही सर्वजण आपल्या दु:खात सहभागी आहोत. असे शाहरुखनं म्हटलं आहे. सलमाननं देखील काल रात्री अशाच प्रकारचे ट्विट केले होते. हिराबा मोदी यांचे निधन काल पहाटे साडेतीनच्या सुमारास झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.