Chaiyya Chaiyya Video Esakal
मनोरंजन

Chaiyya Chaiyya Video: व्हाईट हाऊसमध्ये मोदींची इंट्री, छैय्या, छैय्या गाण्यानं जंगी स्वागत

Vaishali Patil

Chaiyya Chaiyya Video: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमेरिका दौऱ्यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या राज्य दौऱ्याच्या निमंत्रणावरून ते तेथे पोहोचले आहेत. या दौऱ्यावर भारत आणि युएसए यांच्यातील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासंबंधी चर्चा होत आहे.

गुरूवारी रात्री युएसएचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनर आयोजित केली होती. संपूर्ण जगाच्या नजरा सध्या पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्याकडे लागल्या आहेत. त्यातच सोशल मिडियावर या भेटीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यातच आणखी एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. यादरम्यान अनेक भारतीय गाणेही सादर करण्यात आले.

यामध्ये ऑस्कर विनिंग RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' हे गाणं देखील सादर करण्यात आले. यासोबतच रिसेप्शनमध्ये शाहरुख खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचे प्रसिद्ध गाणे 'छैय्या छैय्या' देखील गायिले गेले. यासोबतच गायक 'ओ रे पिया' गाणं देखील गाण्यात आलं.

'पेन मसाला' या दक्षिण आशियाई गुप्रने व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य स्वागत समारंभात शाहरुख खानचं प्रसिद्ध गाणे 'छैय्या छैय्या' सादर केले.

या व्हिडिओमध्ये 19 लोक हे गाणी गाताना दिसत आहेत. सर्वजण काळ्या रंगाचे सूट घातलेले दिसतात. यावेळी 'वंदे मातरम', 'भारत माता की जय' आणि 'मोदी, मोदी' अशा घोषणाही व्हिडिओ ऐकू येत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

'पेन मसाला' या दक्षिण आशियाई गट हा खुप प्रसिद्ध बॅण्ड आहे. व्हाईट हाऊसमध्ये यापूर्वी अनेकदा त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत. 'पेन मसाला' ने आयफा अवॉर्ड्स आणि हॉलिवूड चित्रपट 'पिच परफेक्ट 2' यासह जगभरात आपली कला प्रदर्शित करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT