Ponniyin selvan: दिग्दर्शक मणिरत्नमचा(Maniratnam) सिनेमा 'पोन्नियिन सेल्वन'चा फर्स्ट लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. तामिळ सिनेमाचा ग्रॅन्ड ट्रेलर समोर आल्यानंतर चर्चेला नुसतं उधाण आलं आहे आणि सिनेमाला दिलेल्या व्हिज्युअल ट्रीटमेंटना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.(Ponniyin selvan ott rights sold for 125 crores amazon prime video bags deal)
पोन्नियिन सेल्वनला भारतातला सर्वात महागडा सिनेमा म्हटलं जात आहे. बातमी समोर येतेय की सिनेमा 500 करोडमध्ये बनला आहे. सिनेमात चियाम विक्रम,ऐश्वर्या राय बच्चन,त्रिशा,जयम रवि,कार्थी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर प्रकाश राज,शोभिता धुलिपाला,ऐश्वर्या लक्ष्मी,प्रभु,जयराम आणि लाल यांच्या सारखे हरहुन्नरी कलाकार सहाय्यक कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाच्या ट्रेलर लॉंचला केवळ दक्षिणेतील नाहीत तर भारतीय सिनेमातील आयकॉन म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे रजनीकांत आणि कमल हासन चीफ गेस्ट म्हणून हजर राहिले होते.
पोन्नियिन सेल्वन दोन भागात रिलीज केली जाणार आहे. याचा पहिला भाग 30 सप्टेंबरला रिलीज होणार आहे तर दुसरा भाग काही महिन्यानंतर रिलीज केला जाईल. थिएटरमध्ये सिनेमा कधी रिलीज होणार याची प्रेक्षक चातकासारखी वाट पाहत आहेतच पण बोललं जात आहे की ओटीटीवर देखील हा सिनेमा पॉप्युलर होण्यात अग्रस्थानी राहील. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने सिनेमाचे ओटीटी राईट्स तगडी किंमत देऊन विकत घेतले आहेत.
बोललं जात आहे की, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने पोन्नियन सेल्वनचे ओटीटी राइट्स 125 करोड देऊन खरेदी केले आहेत. सिनेमाचं बजेट पाहता, ओटीटी राईट्स साठी खर्च केलेली किंमतही योग्यच म्हणावी लागेल. या महिन्यात पोन्नियन सेल्वनचा पहिला भाग थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे,तिथे अॅमेझॉन प्राइमने आधीच या सिनेमाच्या दोन्ही भागांचे ओटीटी राइट्स खरेदी केले आहेत. अशावेळी हे बोलणं नक्कीच चुकीचं ठरणार नाही की 500 करोडचं बजेट असणाऱ्या सिनेमानं रिलीज आधीच 125 करोड कमावले.
मिळालेल्या वृत्तानुसार माहिती समोर येत आहे की,पोन्नियन सेल्वनचे सॅटेलाइट राइट्स खूप महाग आहेत. हे राइट्स सन टी.व्हीने खरेदी केले आहेत आणि सिनेमाच्या रिलीजच्या एक आठवडा आधीच या चॅनेलवर सिनेमाचा ओडियो आणि ट्रेलर लॉंच सोहळा प्रक्षेपित केला जाईल. पोन्नियन सेल्वनचे बजेट आणि स्टारकास्ट दमदार आहे. तसंच, सिनेमाला संगीत ए.आर.रहमान यांचे आहे जे सिनेमाच्या इतर हायलाइट्पैकी एक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.