Pooja Bhatt bollywood actress  
मनोरंजन

Bigg Boss OTT 2 : '11 वर्षे संसार झाला, त्यानं कधीही...! मी आई होईल का?' 51 वर्षांच्या अभिनेत्रीची खंत

पुजा आता बिग बॉस ओटीटीवर आली आहे. यानिमित्तानं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ते ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pooja Bhatt Husband On Broken Marriage : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पुजा भट्ट ही आता बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. आताही तिनं वेगळ्या गोष्टींबाबत केलेला धक्कादायक खुलासा अनेकांसाठी चर्चेचा विषय आहे.

पुजा आता बिग बॉस ओटीटीवर आली आहे. यानिमित्तानं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ते ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी पुजानं तिच्या दारु पिण्याच्या सवयीवरुन प्रतिक्रिया दिली होती. त्यात तिनं पुरुषांनाचा दारु पिण्याचा अधिकार आहे का, महिला दारु पिऊ शकत नाही का असा प्रश्न विचारुन वेगळ्या वादाला सुरुवात करुन दिली होती. आता पुजा वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे.

Also Read -Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

पुजानं आपण आपल्या नवऱ्यासोबत घटस्फोटाचा निर्णय का घेतला याविषयी त्या मुलाखतीमधअये सांगितले आहे. त्यामुळे तिच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चाही सुरु झाली आहे. पुजा म्हणते, आमच्या लग्नाला अकरा वर्षे झाली तरीही आमच्यात काही आलबेल नव्हतं. त्यामुळे मला त्यावरुन कुणालाही काही खोटे सांगायचे नव्हते. किंवा त्यावरुन कोणतेही स्पष्टीकरणही द्यायचे नव्हते.

त्या मुलाखतीमध्ये पुजाला तिच्या गतकाळातील वैवाहिक नात्याविषयी विचारणा केली. तेव्हा पुजानं जे सांगितले ते चक्रावून टाकणारे होते. खरं तिची मुलाखत घेणाऱ्या बेबिकानं तिला तिच्या नवऱ्याच्या जन्मराशी विषयी विचारलं होतं. तर ती म्हणते त्याची मकर होती. तेव्हा बेबिका म्हणते, मकर राशीचा नवरा म्हणजे तो खूपच प्रॅक्टिकल असणार. तो चांगला वडीलही झाला असता. त्याच्यात ती क्षमता होती. हे ऐकताच पुजानं तिला मनातलं सांगून टाकलं.

मी खरं सांगते तेव्हा माझे लक्ष संसारात नव्हते. त्याला मुल हवं होतं. आणि मला तेव्हा मुलाबाळांमध्ये अडकून पडायचे नव्हते. पण आता मला मुलं आवडू लागली आहेत. मी खोटं कशाला बोलू. जे आहे ते आहे. मला माहिती आहे की, असं बोलणं कदाचित माझ्यासाठी खूपच धोकादायक असू शकतं. मला आजवर माझ्या बोलण्याचा कधी पश्चाताप झालेला नाही. मी त्यावर ठाम राहिले आहे. आम्ही एकमेकांवर आरोप करण्यात काहीच अर्थ नव्हता.

लग्न झालं होतं पण...

अनेकांना माहिती नसेल पण पुजाचे लग्न झाले होते. मनीष मखीजा नावाच्या व्यक्तीसोबत पुजाचं लग्न झालं होतं. तो मुंबईतील एका मोठ्या हॉटेलचा मालक होता. त्या दोघांचा प्रेमविवाह होता. मात्र ते नातं फार काळ टिकलं नाही. दोन महिने एकमेकांना डेट करुन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. २००३ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. अकरा वर्षांनी त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Pune Traffic : पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा; चारही महामार्ग जोडणारा ४५ किमीचा 'ट्विन टनेल' भूमिगत रस्ता प्रस्तावित

SCROLL FOR NEXT