Pooja Bhatt on seatbelt rule indirect dig on safety rules after cyres mistry death.
Pooja Bhatt on seatbelt rule indirect dig on safety rules after cyres mistry death. Google
मनोरंजन

सीट बेल्ट सक्तीवरनं पूजा भट्टची सरकारवर कडवी टीका; म्हणाली,'एवढंच गरजेचं तर आधी..'

प्रणाली मोरे

Pooja Bhatt: टाटा सन्सचे माजी चेअरमन साइरस मिस्त्री(Cyres Mistry) यांचा रस्ता दुर्घटनेत(Road Accident) मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला. ज्या निर्णयानुसार सीट बेल्ट(Seat Belt) लावणं अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता गाडीत मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही सीट बेल्ट लावणं अनिवार्य झालं आहे. तसं केले नाही तर मोठा भुर्दंड भरावा लागणार आहे. सरकारच्या या नियमावर आता निर्माती-अभिनेत्री पूजा भट्टनं(Pooja Bhatt) तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.(Pooja Bhatt on seatbelt rule indirect dig on safety rules after cyres mistry death.)

पूजा भट्टनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,''सध्या सीट बेल्ट्स आणि एअर बॅग्जविषयी बोललं जात आहे. पण हे खरंच गरजेचं आहे का? असेलही,पण यापेक्षा अधिक गरजेचं आहे ते रस्त्यातील मोठे खड्डे, आणि त्यांची दुरावस्था सुधारण्याचं काम. रस्ते,हायवे,फ्रीवे बांधताना अतिशय दुय्यम दर्जाचं सामान वापरणाऱ्या कंत्राटदारांना कधी शिक्षा होणार? तसंच,रस्ता बांधल्यावर वेळोवेळी त्याची डागडुजी होणं गरजेचं आहे. पण हे इथे होताना दिसतच नाही. एकदा रस्ता बांधला की मोठ्या दिमाखात त्याच्या उद्घाटनावर फक्त वारेमाप खर्च केला जातो पण त्यानंतर त्याच्या दुरावस्थेकडे ढुंकूनही कोणी पाहत नाही''.

Pooja Bhatt Tweet

पुजा भट्टचे हे ट्वीट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.. कोणी तिला यावरनं ट्रोल करताना दिसत आहे तर कुणी तिच्या मताशी सहमती दर्शवत आहे. एका नेटकऱ्यांन पूजा भटच्या ट्वीटची खिल्ली उडवत म्हटलं आहे,'मॅम हे असं आहे की जर तुम्ही सडक सारखा सिनेमा बनवाल तर प्रत्येक जण त्याला पाहील पण जर तुम्ही सडकछाप सिनेमा बनवाल तर मात्र लोक ढुंकूनही त्याच्याकडे पाहणार नाहीत'. एका नेटकऱ्याने तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यावरही टीका केली आहे.

दुसरा एक नेटकरी म्हणालाय की,'तुम्ही बरोबर बोलत आहात. मागच्या लोकांनी सीटबेल्ट लावला पाहिजे याइतकंच रस्ता तयार होताना जी सामुग्री वापरली जाते त्याचा दर्जाही तपासला गेला पाहिजे. खड्डेमुक्त रस्ते व्हायला हवेत', आणखी एकानं लिहिलं आहे की,'तुम्ही कधी हायवे वर गाडी चालवलीय की फक्त आकाशात विमानातूनच प्रवास केलाय,कारण जर हायवेवर गाडी चालवली असती तर हे असं ट्वीट केलं नसतं'.

पूजा भट्टच्या कामाविषयी बोलायचं झालं तर २०२० मध्ये आलेल्या 'सडक २' मध्ये तिनं कॅमिओ साकारला होता. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. सिनेमाला समिक्षकांसोबत प्रेक्षकांनीही झोडपलं होतं. सिनेमात संजय दत्त,आदित्य रॉय कपूर,आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका होत्या. पूजा भट्टच्या आगामी सिनेमाचं नाव 'चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट' हे आहे. या सिनेमात सनी देओल,दुलकर सलमान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा २३ सप्टेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT