Poonam Pandey 
मनोरंजन

Lock Upp Kangana: कपडे काढणं पडलं महागात, पुनम पांडे जेलमध्ये

टीव्ही मनोरंजन वाहिनीवर सध्या ज्या मालिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती मालिका (Tv Entertainment) येत्या 25 फेब्रुवारीपासून प्रदर्शित होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Poonam Pandey Lock Upp Third Contestants: टीव्ही मनोरंजन वाहिनीवर सध्या ज्या मालिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती मालिका (Tv Entertainment) येत्या 25 फेब्रुवारीपासून प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी सहभागी होणार आहे. त्यातील काही स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. एकुण 16 सेलिब्रेटींचा (Kangana Ranaut) त्यात समावेश असणार आहे. कंगनाच्या लॉक अप या मालिकेवरून मोठ्या वादालाही सुरुवात झाली आहे. तिच्या या शो मध्ये निशा रावल, मुनाव्वर फारुकी आमि पुनम पांडे सहभागी होणार आहे. पुनम पांडे तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. त्यामुळे तिला कंगनाच्या जेलमध्ये बंदिस्त करण्यात आले आहे.

पुनम पांडेनं जो व्हिडिओ शेयर केला आहे त्यामध्ये तिनं म्हटलं आहे की, मी भारतातील वादग्रस्त सेलिब्रेटींपैकी एक आहे. आता मी सर्वात वादग्रस्त शो लॉक अपचा भाग आहे. मला या शो च्या माध्यमातून नेटकऱ्यांना काही गोष्टी सांगायच्या आहेत. अनेकदा लोकही आम्हाला खूप ग्राह्य धरायला लागतात. ते चूकीच्या पद्धतीनं आम्हाला जज करतात. हे चूकीचे आहे. प्रत्येक कलाकाराची स्वताची स्पेस असते. ती आम्हाला दिली जात नाही. आणि पुन्हा आम्ही आमच्या मनाप्रमाणे वागू लागल्यास त्यावरुनही ट्रोल केले जाते. लोकं तर कशावरुनही बोलू लागतात. तेव्हा त्यांचा राग येतो. मी या शो च्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर आणणार आहे.

कंगनाच्या नव्या शो ची मोठया प्रमाणात चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या शो च्या टीझरनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामध्ये 16 वादग्रस्त बॉलीवूड सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश आहे. या सेलिब्रेटींना आता कंगनाच्या देखरेखेखाली राहावं लागणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश आहे. पुनम पांडे ही त्यापैकी एक आहे. काही झालं तरी प्रेक्षकांपुढे बॉलीवूडमधील सत्य उलगडून सांगणार असल्याचे कंगनानं सांगितले होते. त्यानंतर तिच्यावर काही सेलिब्रेटींनी टीकाही केली होती. त्यात राखी सावंतच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. तिनं सलमानवर टीका केल्याप्रकरणी कंगनाला धारेवर धरले होते. 27 फेब्रुवारी पासून या शो चा प्रीमिअर चाहत्यांसमोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT