Poonam Pandey speaks On population Control, video viral Google
मनोरंजन

'मुलांना जन्म देऊ नका',असं का म्हणाली पूनम पांडे? व्हायरल व्हिडीओची चर्चा

पूनम पांडे तिच्या हॉट फोटोमुळेच नाही तर अनेकदा बोल्ड वक्तव्यांमुळेही चर्चेत येते अन् अनेकदा वादात सापडते.

प्रणाली मोरे

कंगना रनौतच्या(Kanhana Ranaut) 'लॉकअप'(Lockup) शो च्या माध्यमातून पूनम पांडे(Poonam Pandey) पुन्हा चर्चेत आली. शो दरम्यान देखील तिची भलतीच चर्चा रंगली होती. कधी तिला मुंबईच्या रस्त्यावर ब्रा न घालता पाहिलं जातं तर कधी पावसाचा आनंद घेत मक्याचं कणीस खाताना देखील कॅमेऱ्यात कैद केलं जातं. अनेकदा विविध कारणांनी तिला ट्रोलही केलं जातं. आता अभिनेत्रीनं वाढत्या लोकसंख्येवर आपलं मत दिलं आहे. चला जाणून घेऊया पूनमच्या सूपीक डोक्यातून देशाची लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी नेमके काय उपाय सुचवले गेलेयत ते.(Poonam Pandey speaks On population Control, video viral)

पूनम पांडे एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीचा एक असा चेहरा आहे,जी जिथे जाईल तिकडे लाइमलाइटमध्ये येतेच येते. काही दिवसांपूर्वी तिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं. स्पोर्टी लूकमध्ये पूनम पांडे छान दिसत होती. या दरम्यान पापाराझीनं तिला भारताच्या वाढत्या लोकसंख्येविषयी प्रश्न विचारला. पापाराझी म्हणाला,'पूनम देशात लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा सध्या उठला आहे,यावर तुझं मत काय आहे?'

या प्रश्नावर पूनम पांडे आधी हसली आणि म्हणाली,''मुलं जन्माला घालू नका''. तर पापाराझीनं पुन्हा तिला विचारलं, 'सरकारला लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत?' यावर पूनम पांडे म्हणाली,''निश्चितच,१०० टक्के. मुंबईचीच लोकसंख्या कशी झपाट्याने वाढत चालली आहे''. एवढं बोलून ती निघून गेली. मात्र पूनमचं हे उत्तर ऐकून काही लोकांनी तिच्या वक्तव्याचे समर्थन केलंय तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.

पूनम पांडे हॉटनेससोबतच बोल्ड स्टेटमेंटमुळेही ओळखली जाते. 'लॉकअप' शो दरम्यान तिनं अनेकदा टॉपलेस होण्याची वक्तव्य केली होती. अगदी प्रेक्षकांना वचनंही दिली होती. यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला अनेकदा एलिमिनेट होण्यापासून वाचवलं होतं. पण इतकं सगळं करुनही शो चं विजेतेपद काही तिनं पटकावलं नाही. एक गोष्ट तर मानावी लागेल की पूनम भले शो जिंकली नाही पण तिची पॉप्युलॅरिटी मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. म्हणजे कोणी तिला पसंत करो वा ना करो पण तिला दुर्लक्षितही केलं जात नाही हे देखील तितकंच महत्त्वाचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT