Porn Star Kendra Lust To Feature In 'Don 3'?
Porn Star Kendra Lust To Feature In 'Don 3'? Google
मनोरंजन

शाहरुखच्या 'डॉन 3' मध्ये रोमा बनून येणार पॉर्न स्टार केंड्रा? वाचा सविस्तर

प्रणाली मोरे

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान(Shah rukh Khan) सोबत काम करायला मिळावं असं स्वप्न अनेक स्टार्सचं असतं. बरं ही इच्छा साता समुद्रा पल्याड राहणाऱ्यांची सुद्धा असते बरं का. प्रसिद्ध पॉर्न स्टार केंड्रा लस्ट(Kendra Lust) देखील यापैकी एक आहे. तिला शाहरुख खानसोबत त्याच्या बहुप्रतिक्षित 'डॉन 3' (Don 3) सिनेमात काम करायचं आहे.(Porn Star Kendra Lust To Feature In 'Don 3'?)

काही दिवस आधी बातमी होती की शाहरुख खान 'डॉन 3' सिनेमा घेऊन येतोय. एवढंच नाही तर अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) देखील या सिनेमाचा भाग असणार आहेत. बॉलीवूडचा बादशहा आणि महानायक यांना सिनेमात एकत्र पाहणं ही चाहत्यांसाठी मोठी ट्रीट असेल. या दोन मेगास्टार्ससोबत आणखी एक तिसरी व्यक्ती आहे जिला या प्रोजेक्टसोबत स्वतःचं नाव जोडायचं आहे. पॉर्न स्टार केंड्रा लस्ट(Kendra Lust) या सुपरहिट प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहे.

Porn Star Kendra Lust Wants To Feature In 'Don 3' With SRK

केंड्रानं फिल्ममेकर रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांना आपलं ट्वीट टॅग करीत लिहिलं आहे-''चला,पब्लिकच्या डिमांडमुळे 'डॉन 3' ची निर्मिती होतेय, मी सुद्धा तयार आहे''. केंड्राचं फक्त इतकंच म्हणणं होतं तरी त्यावर कमेंट्सचा नुसता वर्षाव होत आहे. नेटकऱ्यांनी कंगनावर प्रश्नांचा भडिमार केलाय. सगळे तिला एकच प्रश्न सारखा विचारत आहेत की,'तू किंग खानची चाहती आहेस का?' लोकांनी तर केंड्रा सिनेमात आली तर 'डॉन 3' ला ब्लॉकबस्टर बनण्यापासून कोणी थांबवू शकत नाही असं थेट घोषित करुन टाकलं आहे. काही नेटकरी रितेश आणि फरहानला केंड्राला सिनेमात घ्या असं विनंती देखील करताना दिसले. सिनेमात रोमाच्या भूमिकेसाठी केंड्राच बेस्ट आहे असं नेटकऱ्यांना वाटत आहे.

काही दिवस आधी केंड्रानं 'जवान' सिनेमाचं एक फॅन मेड पोस्टर शेअर केलं होतं. तिनं तेव्हा ट्वीट करत लिहिलं होतं- ''शाहरुखला नेहमीच अॅक्शन सिनेमात पहावं अशी माझी इच्छा होती. काय टीझर आहे. एटलीच्या या मास्टरपीसची मी वाट पाहीन''. केंड्राच्या या ट्वीटवरनं एक गोष्ट मात्र लक्षात येते की किंग खानच्या सगळयाच प्रोजेक्टवर तिचं लक्ष आहे. ती शाहरुखची जबरदस्त चाहती आहे.

ही गोष्ट झाली केंड्राची,आता जरा शाहरुखच्या प्रोजेक्टविषयी जाणून घेऊया. किंग खानचे कितीतरी सिनेमे वाटेवर आहेत. पुढील वर्षी त्याचे दोन मोठे सिनेमे प्रदर्शित होतायत. पठाण आणि जवान. डंकी आणि डॉन 3 वर काम सुरु आहे. सध्या डॉन 3 च्या स्क्रीप्टवर काम सुरु आहे. आता पहायचं खरंच तिची डॉन 3 सिनेमात काम करण्याची इच्छा शाहरुख आणि टीम पूर्ण करतायत का. आणि खरंच चाहत्यांच्या म्हणण्याप्रमाणे सिनेमात ती रोमा बनून येतेय का.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT