Post pregnancy weight loss tips by personal nutritionist of actor anushka sharma.jpg 
मनोरंजन

बाळंतपणानंतर वाढलेले वजन कसे कमी करायचे? वाचा अनुष्काच्या न्युट्रीशियनच्या टिप्स

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रसिध्द अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला. तीचे नाव त्यांनी वामिका ठेवले. त्यानंतर अनुष्काने तिच्या डिलेव्हरीनंतरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटो पाहून तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, अनुष्काने डिलेव्हरीनंतर तिचे वजन कसे कमी केले. डिलेव्हरीच्या आधी आणि नंतरचे बिफोर आफ्टर फोटो अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केले होते. अनुष्काने डिलेव्हरीनंतर फिगर फिटनेस कसा ठेवला असेल? तिने नेमके कोणते डायट फॉलो केले असेल? असे अनेक प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर त्याचे उत्तर अनुष्काच्या न्युट्रीशियन रेयान फर्नांडोने दिले आहे.

अनुष्काच्या न्युट्रीशियन रेयान फर्नांडोने सांगितले की, नॉर्मल डिलिव्हरी झाली तर रिकव्हर व्हायला 16 आठवडे आणि सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास रिकव्हर व्हायला 30 आठवडे लागतात. गरोदरपणाच्या  काळात स्त्रीच्या शरिरात  प्लेसेंटा आणि एम्‍निओटिक फ्लूइड असतो. डिलेव्हरी नंतर तो निघून गेल्यावर गरोदर स्त्रीचे वजन कमी होऊ लागते. पण  गरोदरपणाच्या काळात तयार झालेले फॅट मात्र निघत नाही. ब्रेस्ट मिल्क फिडींगमुळे स्त्रीचा ब्रेस्टचा आकार वाढतो. त्यामुळे बॉडीचा शेप बिघडतो न्युट्रिशनिस्ट रेयान फर्नांडो यांचे म्हणणे आहे की, बाळंतपणानंतर बॉडीचा शेप ज्या प्रकारे बदलतो, त्यावरून सहज ओळखता येते की स्त्रीसाठी कोणत्या प्रकारचा वेट लॉस प्लॅन योग्य ठरेल.

जर गरोदरपणाच्या काळात पोटाच्या आसपास जास्त फॅट जमा झाले असेल तर डिलिव्हरीनंतर लगेचच बॉडीला पुन्हा शेपमध्ये येण्यास वेळ लागू शकतो. मात्र यावर न्युट्रिशियन रेयान फर्नांडो हिने काही टिप्स अनुष्काला तिच्या डिलेव्हरीनंतर दिल्या. त्या टिप्स त्यांनी तिच्या फॅन्ससोबत देखील शेअर केल्या आहेत.
 
डिलेव्हरीनंतर संतुलित आहार घेणे अत्यंत महत्वाचे असते. डिलेव्हरीनंतर स्त्रीचा संतुलित आणि पौष्टिक आहार असावा असे न्युट्रिशनिस्ट रेयान फर्नांडोचे म्हणणे आहे. वजन कमी करण्यासाठी सतत जिममध्ये जाऊन वर्क आऊट करणे गरजेचे नसते. डिलेव्हरीनंतर स्त्रीचे शरीर जिमच्या वर्क आऊटसाठी तयार नसते. अशा वेळी संतुलित आहार घेऊन पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे अत्यंत महत्वाचे असते. यामुळे स्त्रीचे वजन नियंत्रीत राहू शकते. यासाठी न्युट्रिशनिस्टचा सल्ला घेऊन त्यांनी दिलेला विशेष डायट प्लॅन फाॅलो करावा. 

अनेक वेळा महिला त्यांच्या बाळाला ब्रेस्ट फिडींग करताना चुकीच्या पध्दतीने बाळाला धरतात. ब्रेस्ट फिडींग करताना कंबरेच्या मागे उशी ठेवावी. याशिवाय संतुलन वाढवणारे व्यायाम करण्यावर भर द्यावा. बाळंतपणानंतर व्यायाम केल्याने वजन कमी करण्यात, चांगली झोप मिळवण्यात, पचनशक्ती सुधारण्यात, एनर्जी वाढवण्यात मदत मिळते. तुम्ही मेडीटेशन आणि डीप ब्रीथिंगचा व्यायाम देखील करू शकता. कारण यामुळे एंग्‍जायटी आणि पोस्‍टपार्टम डिप्रेशनचा धोका कमी होतो. आहारात स्त्रीने शक्य तितके हलके पदार्थ खावेत. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थापासून दूरच राहावे. अन्यथा आई व बाळासाठीही धोका निर्माण होऊ शकतो. 

न्युट्रिशनिस्ट रेयान फर्नांडो यांनी सांगितले की, डिलेव्हरी नंतर योग्य वेळ झोप घेणे खूप महत्वाचे आहे. गरोदर स्त्रीने शक्य तितकी झोप घ्यावी आणि आराम करावा. स्त्री जेवढी जास्त झोप घेईल तेवढे तिचे शरीर निरोगी राहील आणि वजन देखील नियंत्रणात राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

Buldhana Accident: मंगरूळ नवघरे येथे काळी पिवळी आणि दुचाकीची भीषण धडक; ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Breaking: लागा तयारीला... BCCI ने जाहीर केली IPL 2026 च्या तारखा; फ्रँचायझींना ई-मेल अन्...

Kolhapur Young Footballers Meet Messi : वानखेडेवर ‘लय भारी’ क्षण; मेस्सीने खेळवले, टिप्स दिल्या आणि कोल्हापूरकरांचा अभिमान वाढवला

Municipal Corporation Election : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT