Prabhas Bald Head Look Goes Viral Photo Left His Fans In Shocked Fact Check  SAKAL
मनोरंजन

Prabhas Bald Look: आदिपुरुष फ्लॉप झाला आणि प्रभासच्या डोक्यावरचे केस गेले, अभिनेत्याच्या व्हायरल फोटोने चाहते हैराण

प्रभासचा टक्कल पडलेला लूक सोशल मिडीयावर व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Prabhas Bald Look Viral News: प्रभासचा आदिपुरुष सिनेमा फ्लॉप झाला. आदिपुरुष सिनेमाकडून प्रभासला खुप अपेक्षा होत्या. पण सिनेमा सपशेल आपटला. आणि प्रभासच्या अपेक्षांवर पाणी फिरलं.

प्रभासचा आदिपुरुष फ्लॉप झाला आणि प्रभासच्या आयुष्यात अजुन एक गोष्ट घडली. त्यामुळे त्याच्या फॅन्सना टेन्शन आलंय. प्रभासचा टक्कल पडलेला फोटो व्हायरल झालाय.

प्रभासचा व्हायरल झालेला फोटो

'बाहुबली' आणि 'साहो' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा पॅन इंडिया स्टार प्रभास सध्या त्याच्या एका फोटोमुळे चर्चेत आहे. खरं तर, अलीकडेच, सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे.

या फोटोत 'आदिपुरुष' स्टार प्रभास एका मुलीसोबत पोज देताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या छायाचित्रात प्रभासच्या डोक्यावर खूपच कमी केस दिसत आहेत. आता या लूकने प्रभासच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे शाहरुख - सलमान नंतर आता प्रभासच्या बाल्ड लूकने सर्वांचं लक्ष वेधलंय.

काय आहे या फोटोमागील तथ्य?

या फोटोची चौकशी केली असता त्याचे सत्यही समोर आले. अलीकडेच 'आदिपुरुष'मध्ये दिसलेल्या प्रभासच्या या फोटोने लोकांना धक्का दिला आणि अस्वस्थ केले. बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांचे केसांचे प्रत्यारोपण झाले आहे.

परंतु प्रभासचा असा लूक याआधी कधीच पाहिला नव्हता. मिडीया रिपोर्टनुसार तपास केला असता या फोटोत कोणतंही तथ्य नसल्याचे दिसून आले. प्रभासच्या काही खोडकर फॅन्सनी फोटोशॉप करून अभिनेत्याचा हा फोटो व्हायरल केलाय.

प्रभासचा आगामी कल्की आणि सलार सिनेमा

प्रभासच्या आगामी कल्की सिनेमाच्या टीझर काहीच दिवसांपुर्वी भेटीला आला. या टीझरमध्ये दीपिका आर्मी जॉईन करताना दिसत आहे. त्याचवेळी अमिताभ बच्चन पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले दिसत आहेत. त्यांचे फक्त डोळे दिसतात.

त्याचवेळी प्रभासचाही योद्धा म्हणून प्रवेश होतो. तो जगाला वाचवण्यासाठी येतो. येथे असे म्हणता येईल की ज्या प्रकारे कलियुगात अत्याचार शिगेला पोहोचतील आणि त्यानंतर भगवान कल्की अवतरतील. तसेच या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याशिवाय प्रभासच्या आगामी सलार सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: कागलमध्ये समेट! हसन मुश्रीफांच्या सून बिनविरोध; शिंदे गटाने घेतली माघार

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

Post Office : तुम्हाला वर्षभरात लखपति बनवू शकते पोस्टाची ही स्कीम! थोडीशी गुंतवणूक करून झटपट व्हाल श्रीमंत?

Video: प्राजक्ता–गश्मीर पुन्हा एकत्र येणार? व्हिडिओ शेअर करत केल्या मोठ्या घोषणा, म्हणाले...'फुलवंतीनंतर आता...'

SCROLL FOR NEXT