मनोरंजन

लवकरच प्रभास आणि दीपिकाची जोडी झळकणार मोठ्या पडद्यावर

संतोष भिंगार्डे

मुंबईः अभिनेता प्रभास आणि बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच एकत्र एका सिनेमात काम करताना दिसणार आहेत.  बाहुबलीच्या रिलीजपासून अभिनेता प्रभासला केवळ भारतच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळाली आहे. तर दीपिका पदुकोण ही भारतीय सिनेमाची सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. वैजयंती मूव्हीजच्या आगामी सिनेमात दीपिका पदुकोण आणि प्रभास ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांसमोर येणार आहे.  या सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक अश्विन नाग करणार आहेत. 

कसा असेल हा सिनेमा 

हा सिनेमा म्हणजे एक साय-फाय ड्रामा आहे. हा प्रभासचा 21 वा सिनेमा आहे, तर दीपिका या सिनेमाच्या माध्यमातून तेलगु सिनेमात पदार्पण करतेय. सोशल मीडियावरून वैजयंती मूव्हीजनं या सिनेमाची आज घोषणा केली आणि एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. 

दिग्दर्शक अश्विन नाग या सिनेमावर बोलताना म्हणाले की, दीपिका या सिनेमा भूमिका साकारत आहे, याचा मला खूप आनंद होतो. दीपिका आणि प्रभास यांची जोडी या सिनेमाचं मुख्य आकर्षण असेल आणि मला विश्वास आहे की हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

भारतीय सिनेमाच्या इतिहासात हा सिनेमा एक विक्रम करेल. हा सिनेमा म्हणजे आमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही न पाहिलेली कथा आणि दृश्ये आम्ही या सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर आणणार आहोत, असं वैजयंती मुव्हीजचे निर्माते सी. अश्विनी दत्त म्हणालेत.

 वैजयंती मुव्हीज हे तेलगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. यांनी नेहमीच अफाट कॅनव्हासवर सिनेमे लावले आहेत. या प्रॉडक्शन हाऊसने आतापर्यंत मोठ्या देखाव्यासाठी खूप कौतुक आणि प्रतिष्ठा मिळविली आहे.

संपादनः पूजा विचारे

prabhas deepika padukone come together star in nag ashwin's movie

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी, पेपरफुटी प्रकरणानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडवर

Raigad Health: वीज नसताना मोबाईल टॉर्चच्या उजेडात यशस्वी प्रसूती; जांभूळपाडा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची धडाडी

Devshayani Ekadashi Celebration: देवशयनी एकादशीला मल्हार हिल विद्यालयात भक्तिरसाचा जल्लोष; रिंगण सोहळ्यात विद्यार्थ्यांनी अनुभवली पंढरीची वारी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, धरणसाठयाने गाठली मागील वर्षाची सरासरी

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT