Prabhas, Puja Hegde In 'Radhe Shyam' Google
मनोरंजन

शर्टलेस,किसिंग सीन देताना प्रभासने घातल्यात अटी; दिग्दर्शकही हैराण

'राधे श्याम' या आगामी सिनेमाच्या मुलाखतीच्या निमित्तानं त्यानं या अटींचा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

'बाहुबली' फेम प्रभासनं(Prabhas) बॉलीवूड(Bollywood)मध्ये आपला जम बसवायला आता सुरुवात केली आहे. त्याचे लवकरच काही हिंदी सिनेमे आपल्या भेटीस येणार आहेत. त्यातलाच 'राधे श्याम'(Radhe Shyam) हा सिनेमा चर्चेतला आहे. हा ऐतिहासिक सिनेमा असला तरी एक रोमॅंटिक ड्रामा आहे. या सिनेमात प्रभास सोबत अभिनेत्री पुजा हेगडे(Puja Hegde) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ११ मार्चला हा सिनेमा आपल्या भेटीस येत आहे.

या सिनेमाच्या बाबतीत नुकतंच प्रभासने म्हटलं होतं की,''यातील इंटिमेट सीन देताना तो कम्फर्टेबल नव्हता''. त्याने म्हटलं होतं,''मी अनेकदा जर सिनेमात किसिंग सीनअसतील तर ते देणं टाळतो. पण जर का स्क्रिप्टची गरज असेल तर पर्याय नसोत हे देखील त्यानं नमूद केलं होतं. प्रभासनं बाहुबली सिनेमासाठी बरीच मेहनत आपल्या शरीरावर घेतली होती. त्याची पिळदार,दणकट शरीरयष्टी जी आधी सिनेमाची गरज होती म्हणून त्यानं बनवली आणि नंतर त्याची ती पर्सनॅलिटी त्याच्या चाहत्यांचं आकर्षणही ठरली. पण त्यानंतर मात्र प्रभासला कॅमेऱ्यासमोर शर्टलेस व्हायला लाज वाटते असं तो म्हणाला. जर माझा एखादा सीन अशा पद्धतीचा असेल तर मी सेटवर खूप कमीत कमी लोकं असावेत अशी डिमांड करतो'',हे देखील त्यानं सांगितलं.

''राधे श्याम या सिनेमाचं कथानक रोमॅंटिक असल्यामुळे अर्थात यात इंटिमेट सीन असणं अपेक्षित होतं. सिनेमा त्या पद्धतीनंच लिहिला गेला होता. त्यामुळे मलाही नाही म्हणता आलं नाही. अॅक्शनपटात आपण हे असे सीन नाकारू शकतो, पण लव्ह स्टोरीत ते कठीण बनतं. आता देखील किसिंग सीन किंवा शर्टलेस सीन असतील तर ते करताना मी कम्फर्टेबल नसतो. तसा एखादा सीन असेल तर मी आधी माणसं सेटवर किती आहेत ते चेक करतो आणि मग जिथे कमी गर्दी असेल तिथे तो करण्यासाठी आग्रह धरतो. 'छत्रपती' सिनेमातही राजामौली यांनी आपल्याला असंच एका गर्दी नसलेल्या ठिकाणी नेलं आणि सेटवर शर्टलेस व्हायला सांगत,आता इथे तू काहीही करू शकतो असं हसत-हसत म्हणाले''.

प्रभास त्याच्या आगामी 'राधे श्याम' सिनेमासाठी खूपच उत्सुक आहे. या सिनेमातील कथानक आपल्याला खूप आवडलं असं तो म्हणाला. प्रेम आणि नशीब यांमधील द्वंद्व या सिनेमात पहायला मिळणार आहे. अनेक रंजक वळणांनी बनलेला हा सिनेमा आहे,मुख्यतः सिनेमाचा शेवट इंट्रेस्टिंग आहे,हे देखील त्यानं नमूद केलं. असो,सिनेमा आता प्रदर्शित होतोय तेव्हा पाहता येईलच प्रभासने किसिंग सीन किंवा शर्टलेस होण्याचे सीन किती कम्फर्टेबल होऊन साकारले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

Latest Marathi News Updates: सुरगाण्यात १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान ICH महोत्सव

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

MP Dhairyasheel Patil: उजनी प्रदूषणाबाबत केंद्र सकारात्मक, राज्य शासन उदासीन: खासदार धैर्यशील मोहिते-पाटील;'आगामी निवडणुका मविआ एकत्रितच लढणार'

Ayush Komkar प्रकरण पोलिसांची मोठी कारवाई, पण मास्टरमाईंड अजूनही फरार..| Andekar Toli | Sakal News

SCROLL FOR NEXT