Prabhas FB Account Hacked: Esakal
मनोरंजन

Prabhas FB Account Hacked: प्रभासला आणखी एक धक्का! फेसबुक अकाउंट हॅक झालं अन् नंतर....

साऊथचा सुपरस्टार प्रभासचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. खुद्द प्रभासने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

Vaishali Patil

Prabhas FB Account Hacked: साऊथचा सुपरस्टार प्रभास याची लोकप्रियता तर सर्वांनाच माहित आहे. तो जरी साउथस्टार असला तरी त्याचे फॅन जगभरात पसरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रभासचं नशिब काही त्याला साथ देत नसल्याचं दिसतयं. त्याचे एका मागून एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहेत. तरी देखील याचा परिणाम त्याच्या स्टारडमवर झालेला नाही.

प्रभास सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. तो क्विचितच पोस्ट शेयर करतो आणि चाहत्यांच्या संपर्कात राहतो. प्रभास त्याच्या आगामी चित्रपटांची माहिती फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनच चाहत्यांसोबत शेअर करतो.

मात्र आता प्रभास सायबर क्राइमचा फटका बसला असल्याच्या बातम्या येत आहेत. प्रभासचे फेसबुक पेज हॅक झाले असल्याचं प्रभासनं स्वत: ट्विट आणि इंस्टाग्रामला पोस्ट करत सांगितलं आहे.

हॅकरने त्याचे अधिकृत फेसबुक हॅक केले. इतकच नाही तर विचित्र पोस्टही शेअर केल्या आहेत. काही काळानंतर हे प्रकरण जास्तच वाढले. त्यामुळे प्रभासला या प्रकरणावर पोस्ट करावी लागली.

प्रभासचे फेसबुक अकाउंट गुरुवारी 27 जुलैच्या रात्री हॅक झाले. अकाउंट हॅक झाल्यानंतर हॅकरने त्याच्या अकाउंटवर दोन व्हिडिओही पोस्ट केले. हॅकर्सनी प्रभासच्या फेसबुकवरून ‘अनलकी ह्युमन’ आणि ‘बॉल फेल अराउंड द वर्ल्ड’ असे दोन व्हायरल व्हिडिओ शेअर केले आहेत.

हॅकरनं हे पोस्ट केल्यानंतर ट्रोलर्सनेही त्याला निशाण्यावर घेतले. ट्रोलर्सने प्रभासच्या बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांवर त्याला टोमणे मारण्याची संधीच मिळाली.

या प्रकारानंतर प्रभासने त्याच्या पेजशी 'compromised' झाल्याचे सांगितले. त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना, त्याने लिहिले की "सर्वांना नमस्कार, माझ्या फेसबुक पेजवर काही छेडछाड झाली आहे, टीम ते सोडवत आहे." लवकरच प्रभासचं अकाउंट रिकव्हर केलं जाईलं.

प्रभासच्या चाहत्यांची संख्या खूप आहे. त्याच्या फेसबुक पेजला 24 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मात्र प्रभास फक्त एसएस राजामौली यांना फॉलो करतो.

काही दिवसांपुर्वी प्रभास 'आदिपुरुष'मध्ये क्रिती सेनन सोबत दिसला होता. आता प्रभास अॅक्शन-थ्रिलर सालार पार्ट 1: सीझफायरमध्ये आणि 'प्रोजेक्ट के' म्हणजेच 'कल्की 2898' या चित्रपटात दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT