बॉलीवूडमध्ये सलमान खान(Salman Khan) हे एक मोठं प्रस्थ आहे. अर्थात असं असलं तरी सलीम खानचा मुलगा असल्याचा फायदा आपल्याला करिअरच्या सुरुवातीला मुळीच झाला नाही हे तो आवर्जुन अनेकदा नमूद करताना दिसला आहे. बॉलीवूडमध्ये आपणही स्ट्रगल केलं आहे असं दबंग खाननं अनेकदा बोलूनही दाखवलं आहे. पण म्हणूनच की काय बॉलीवूडमध्ये स्ट्रगल करणाऱ्या अनेकांना तो मदतीचा हात देताना दिसतो. हो पण एखादी व्यक्ती त्याच्या विरोधात गेली की त्या व्यक्तीचं काय होतं याची अनेक उदाहरणं सांगता येतील. विवेक ओबोरॉय हे त्याचं प्रातिनिधिक उदाहरण जे सर्वांनात माहित असावं बहुधा. पण असो,सगळ्यांमध्येच जसे चांगले तसे वाईटही गुण असतात. आपला भाईजान त्याला अपवाद कसा असेल बरं. आता पुन्हा सलमानच्या चांगुलपणाचा एक अनुभव तेलगु अभिनेत्री प्रज्ञा जैसवाल हिला आला आहे.
'मै चला' या व्हिडीओ सॉंगच्या माध्यमातून प्रैज्ञा जैसवाल सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसली आहे. या गाण्याची निर्मिती टीसीरिजसोबतच स्वतः सलमान खानने केली आहे. हे एक रोमॅंटिक गाण आहे. या गाण्याच्या निर्मिती मागे नेमकं काय कारण आहे हे अभिनेत्रीने नुकतच एका मुलाखतीतून स्पष्ट केलं आहे. ती म्हणाली,''खरंतर सलमानच्या 'अंतिम' सिनेमात हे गाणं आमच्यावर चित्रित होणार होतं. आम्हा दोघांना ते खूप आवडलं होतं. सगळं जुळून आलंचं होतं. पण अचानक काही कारणांमुळे निर्णय बदलले अन् ते शक्य झालं नाही. ते गाणं सिनेमातून वगळण्यात आलं.
पण का कुणास ठाऊक माझ्या मनात आशा होती की हे गाणं सिनेमात जरी घेतलं नसलं तरी हे गाणं स्वतंत्र नक्कीच प्रदर्शित केलं जाईल. आणि खरंतर तेव्हा सलमानला ते गाणं सिनेमातून काढून टाकल्याने वाईट वाटलं होतं. त्याने गाणं सिनेमात कसं घेता येईल यासाठी प्रयत्न केले पण ते काही शक्य झालं नाही. शेवटी त्याने सिनेमातलं 'मै चला' हे गाणं अशा पद्दतीनं प्रदर्शित केलं. आणि तेव्हा नकळत मला दिलेला शब्द त्यानं असा पाळला. सलमान या गाण्यात पंजाबी लूकमध्ये सर्वांनाच भावला आहे. नुकतच हे गाणं प्रदर्शित झालं असून सगळ्यांच्या पसंतीसही उतरलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.