Prajakta Koli, Prajakta Koli news, Prajakta Koli webseries, ekvira devi temple, lonavala SAKAL
मनोरंजन

Prajakta Koli: प्राजक्ता कोळी लोणावळ्यातील एकविरा आईच्या दर्शनाला, देवीसमोर झाली नतमस्तक

प्राजक्तासाठी हि अत्यंत आनंदाची आणि तिच्या आई बाबांसाठी अभिमानाची गोष्ट आहे

Devendra Jadhav

Prajakta Koli News: Prajakta Koli News: फार कमी वेळात युट्युब वर व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून यशस्वी होणारी मराठमोळी कंटेंट क्रियेटर म्हणजे प्राजक्ता कोळी. शून्यातून विश्व निर्माण करणारी म्हणून प्राजक्ता कोळीची ओळख आहे.

हृतिक रोशनपासून रणवीर सिंग पर्यंत अनेक बॉलिवूड तसेच आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींसोबत तिने व्हिडिओ बनवले आहेत.

(Prajakta Koli going to ekvira temple lonavala to visit ekvira devi)ar

मराठमोळी प्राजक्ता पुन्हा एकदा चर्चेत आलीय ती म्हणजे प्राजक्ता नुकतीच लोणावळातील कार्ला डोंगरावर असलेल्या एकविरा आईच्या मंदिरात दर्शनाला गेली आहे.

प्राजक्ताने सोशल मीडियावर 'नजर हाय तुझी कोल्यांवरी' असं कॅप्शन देऊन हा खास फोटो शेयर केलाय. प्राजक्ता देवीसमोर हात जोडून नतमस्तक झालेली दिसतेय.

प्राजक्ताच्या या फोटोवर अनेकांनी 'एकविरा माते कि जय' अशा कमेंट करून लव्ह रिऍक्शन दिली आहे. प्राजक्ता कोळी सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते.

तिचे विविध सेलिब्रिटींसोबत असलेल्या फोटो आणि व्हिडिओवर फॅन्स पसंती देत असतात.

प्राजक्ता जरी जगभरात स्वतःचं नाव कमावत असली तरीही तिने अस्सल मराठमोळ्या संस्कृती आणि परंपरेशी तिची नाळ जोडून ठेवली आहे.

प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टवर अनुष्का शर्मा, सुनिल शेट्टी, नेहा कक्कर, अनन्या पांडे व अनेक दिग्गज कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.

प्राजक्ता कोळीचे बाबा कॅडबरीच्या कंपनीत शिफ्टमध्ये काम करायचे आता त्याच कंपनीची प्राजक्ता कोळीने जाहिरात केली आहे. त्यामुळे प्राजक्ता भावूक झाली आहे.

प्राजक्ताने जाहिरातीचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचे आई-बाबा देखील दिसत आहे.

प्राजक्तासाठी हि अत्यंत आनंदाची आणि तिच्या आई बाबांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. नेटफ्लिक्सवर लवकरच प्राजक्ताची भूमिका असलेल्या मिसमॅच या गाजलेल्या सिरीजचा तिसरा सिझन येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Kolhapur : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाळूमामा मंदिर तीन मार्चपासून बंद राहणार

Maharashtra Railway Project : महाराष्ट्रात नवा रेल्वे प्रकल्प ! ५,४०० गावांना जोडणारा २३१ किलोमीटरचा रेल्वे मार्ग मंजूर

Paithan Accident: कालव्यातील तिघांचा लागेना ठावठिकाणा; चांगतपुरीजवळ रात्री कोसळली होती कार, शोधमोहीम सुरूच..

Latest Marathi News Live Update : नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीदरम्यान पत्रकारांवर अन्याय

Kolhapur MSEDCL : कृषिपंपांची बनावट वीज बिल थकबाकी शेतकऱ्यांच्या माथी; राज्य इरिगेशन फेडरेशनचा आरोप

SCROLL FOR NEXT