Prajakta Mali new role play in post office ughad ahe serial on sony marathi sakal
मनोरंजन

Prajakta Mali: दिसायला गोड पण कामात कडक! प्राजक्ता माळीची पोस्टात एन्ट्री!

‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ मालिकेद्वारे प्राजक्ता माळीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन!

नीलेश अडसूळ

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. सुरुवातीच्या काळात काही मालिकांत काम करून प्राजक्ता घराघरांत पोहोचली.

फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही स्वप्न तिनी पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. मालिका, चित्रपट, वेबसिरीज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच, पण त्याबरोबरीनेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही तिनी उत्तमरीत्या पेलली आहे.

सुरुवातीपासूनच ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता प्राजक्ता माळी आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहे. कारण ती आता पोस्टात दिसणार आहे.

(Prajakta Mali new role play in post office ughad ahe serial on sony marathi)

‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेत तिची एन्ट्री होणार आहे. तब्बल ६ वर्षांनी ती मालिकेत पुनरागमन करते आहे. तिला मालिकेत पाहण्याची संधी मिळत असल्याने तिचा चाहतावर्ग नक्कीच खूश होणार आहे आणि तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. पारगाव पोस्टात तिच्या येण्यामुळे काय धमाल होणार आहे, हे पाहणे रंगतदार ठरेल.

पोस्टात संगणक येण्याने आधीच सर्वांच्या कामात गोंधळ निर्माण झाले आहेत. त्यात आता पोस्टात नवीन एन्ट्री झाल्यामुळे आणखीनच मजा येणार आहे. प्राजक्ता सगळ्यांची शाळा घेणार आहे. रोज पोस्ट ऑफिस सुटल्यानंतर सर्वांना एक तास प्राजक्ताच्या शाळेत आता संगणकाचे धडे घ्यायचे आहेत. विशेष म्हणजे या भूमिकेत प्राजक्ता दिसायला गोड असली तरी कामाच्या बाबतीत मात्र प्रचंड कडक शिस्तीची दाखवली आहे. त्यामुळे प्राजक्ताचा हा अंदाज पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT