prajakta mali post viral gone to sri sri ravi shankar ashram doing art of living advanced course Esakal
मनोरंजन

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा फोन बंद ! मौनव्रत धारण करत सोशल मिडियावर दिले मोठे संकेत..

Vaishali Patil

मराठी मनोरंजन विश्वामध्ये प्राजक्ता माळी सध्या चर्चेत आहे. प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते. मात्र आता तिने प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना एक खास न्युज दिलीय.

प्राजक्ता आता श्री श्री रवीशंकर यांच्या त्रिवेणी आश्रमात पोहोचली आहे. तिथून तिने एक पोस्ट शेयर केली आहे. तिथे प्राजक्तानं मौनव्रत धारण केलं आहे.

तिथे गेल्यावर तिने तिचे काही फोटो शेयर केले आहेत ज्यात तिने लिहिलं आहे की, "आयुष्यात कितीही घरं-दारं झाली; तरी आर्ट ॲाफ लिव्हींगचं आश्रम माझं सगळ्यात आवडतं ठिकाण होतं, आहे आणि असेल", असं म्हणत प्राजक्तानं आश्रमातील फोटो शेअर केले आहे.

प्राजक्तानं सुरुवातीला आर्ट ऑफ लिविंगचा कोर्स केला होता. आता ती याच कोर्सची अँडवान्स ट्रेनिंग घेण्यासाठी गेली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये सांगतिले आहे की, तिचा फोनही काही दिवस किंवा तास बंद असेल. या पोस्टसोबतच तिने #गुरूतत्व #सानिध्य #ध्यान #योगी #शांती असे काही हॅशटॅगही वापरले आहेत.

या फोटोसोबत तिने खाली कॅप्शनमध्ये कधीही आश्रमवासी होऊ शकते अशी हिंटही दिली आहे. सध्या प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

काही दिवसांपुर्वीच प्राजक्तानं कर्जतला निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या पायथ्याशी नवीन घर घेतलंय. याचे फोटोही तिने सोशल मिडियावर शेयर केले होते. फोटो पोस्ट करत प्राजक्तानं लिहीलं होत की, "स्वप्न साकार…Happy owner of my dream “Farm House” (डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे,एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं.) कर्जत.. नाव असणार आहे- “प्राजक्तकुंज”.(प्राजक्तत्रयी पुर्ण.). प्राजक्तानं हे घर कर्ज काढून घेतल्याचं तिनं म्हटलं होतं.

प्राजक्ता माळीचा  प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रॅण्ड आहे. प्राजक्ता माळी वेळोवेळी तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या ब्रँडचं प्रमोशन करताना दिसते. प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतेय. 

प्राजक्ता सध्या ब्रेकवर असून तिच्या नवीन सिनेमाची किंवा मालिकेची तिचे चाहते वाट बघत आहेत. आता ती श्री श्री रवीशंकर यांच्या त्रिवेणी आश्रमात असून मनशांतीचा आनंद घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT