Prajakta Mali Bhagat Singh Koshyari esakal
मनोरंजन

अभिनेत्री प्राजक्ता माळीला मिळाला राज्यपालांच्या हस्ते मानाचा पुरस्कार

सकाळ डिजिटल टीम

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रिय आहे. आपल्या सौंदर्यासह सहज सुंदर अभिनयानं तिनं इंडस्ट्री गाजवलीय. आजपर्यंत तिनं अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय. पण, काल मंगळवारी अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) निमित्तानं तिच्या आयुष्यात आणखी एका सुवर्ण योगाचा समावेश झालाय.

अभिनेत्री प्राजक्ता माळी अक्षय्य तृतीयेदिवशी राजभवनात गेली होती. यादिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते तिला ‘कमला रायझिंग स्टार’ पुरस्कारानं गौरविण्यात आलं. याविषयी तिनं स्वतः सोशल मीडियावर माहिती दिलीय. प्राजक्ता माळीनं इन्स्टावर पुरस्कार सोहळ्याचे काही फोटो शेअर करत म्हटलंय की, आणि कालच्या शुभमुहूर्तावर 'मुंबई- राजभवनात' जाण्याचा योग आला.. काल महाराष्ट्राचे राज्यपाल - मा. श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 'Kamala Rising Star' पुरस्कार मिळाला. मनापासून धन्यवाद, आयोजन समिती व मा. राज्यपाल.! अमित त्रिवेदी, प्रतिक गांधी, शेफ रणवीर ब्रार, बिझनेस वूमन अनन्या बिर्ला, आकाश ठोसर इत्यादी माझ्या काही आवडत्या व्यक्तींसह हा पुरस्कार मिळाला ह्याचा विशेष आनंद. प्रेक्षकांच्या प्रेमाचं परिवर्तन अशा पुरस्कारांमध्ये होतं असं मला वाटतं, त्यामुळं सर्व प्रेक्षकांचे देखील मनापासून आभार! असंच प्रेम राहू द्या. (आई आणि भाऊ या सोहळ्यासाठी खास पुण्याहून आले होते, फोटो काढायचा राहिला, आईनं आकाश बरोबर आवर्जून काढला.. चालायचं) #कृतज्ञ #महाराष्ट्र #सह्याद्रिचीलेक #prajakttamali सध्या तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केलीय. यात तिनं काही फोटोही शेअर केलेत. या फोटोंत प्राजक्तानं सुंदर अशी गुलाबी रंगाची काठा पदराची साडी परिधान केल्याचं दिसत आहे. शिवाय, या सोहळ्याला तिची आई देखील उपस्थित होती. या फोटोंमध्ये प्राजक्ता कमला रायझिंग पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते स्वीकारतानाचे काही फोटो दिसत आहेत. दरम्यान, तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करीत तिचं कौतुक केलंय.

प्राजक्ता माळीची पोस्ट नक्की काय होती?

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्राजक्ता चंद्रमुखी सिनेमामुळं चर्चेत आली नाही, तर राज ठाकरेंसंबंधित केलेल्या पोस्टमुळं चर्चेत आलीय. आज 3 तारीख असं म्हणत प्राजक्तानं भोंग्यांच्या अल्टिमेटमची आठवण करुन दिलीय. 'सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा.. आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो पोस्ट करत आहे. असो... आज 3 तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल, अशी आशा बाळगते. राज ठाकरे धन्यवाद... परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूंच्या-महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून ऊर अभिमानानं भरुन आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशाप्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटतं...?' अशी पोस्ट तिनं शेअर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan on Epstein files : ‘मराठी माणूस पंतप्रधान होणार’ यावर पुन्हा पृथ्वीराज चव्हाणांनी केलं वक्तव्य, फुसका बार की मराठी पंतप्रधान?

Bangladesh Crisis: बांगलादेश पेटला! युवा नेत्याच्या हत्येनंतर राजधानीत आग, वर्तमानपत्रांची कार्यालये जळाली; देश अराजकतेच्या उंबरठ्यावर

Mumbai Local Megablock: मुंबई लोकलनं प्रवास करताय? पण मेगाहाल होणार; पाहा कुठे अन् कोणत्या मार्गावर असणार मेगाब्लॉक?

'मी रक्तबंबाळ झालो, ७ वर्षांच्या लेकीला धक्का', पायलटची प्रवाशाला कुटुंबियांसमोर मारहाण

UGC NET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तुमचा विषय कधी आहे?

SCROLL FOR NEXT