Prajakta mali took off a huge loan, buy the luxurious house at karjat marathi actress SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: प्राजक्ताने भलंमोठं कर्ज काढून घेतलं 'या' ठिकाणी घर, आलिशान घराची झलक बघा

प्राजक्ताने कर्ज काढून हे नवीन घर घेतलंय.

Devendra Jadhav

Prajakta Mali Buy New Home News: प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते.

प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना एक खास न्युज दिलीय. प्राजक्ताने स्वतःचं नवीन घर घेतलं आहे. प्राजक्ताने सोशल मिडीयावर पोस्ट करत ही बातमी दिलीय. प्राजक्ताने कर्ज काढून हे नवीन घर घेतलंय.

(Prajakta mali took off a huge loan, buy the luxurious house at karjat marathi actress)

प्राजक्ताने या ठिकाणी घेतलंय नवीन घर ?

प्राजक्ताने कर्जतला नवीन घर घेतलंय. कर्जतला निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या पायथ्याशी घर घेतलंय. प्राजक्ताने नवीन घराचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केलेत.

हे फोटो पोस्ट करुन प्राजक्ता लिहीते. "स्वप्न साकार…Happy owner of my dream “Farm House” (डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे,एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं.) कर्जत.. नाव असणार आहे- “प्राजक्तकुंज”.(प्राजक्तत्रयी पुर्ण.)

प्राजक्ता शेवटी कर्जासंबंधी लिहीते की.. खानदानातली सर्वात सुंदर property, खानदानातल्या.. सर्वात मोठ्या कर्जासहीत.. फेडू.. फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या. #हक्काचं_घर #प्राजक्तकुंज #गुरुकृपा अशी पोस्ट करत प्राजक्ताने नवीन घराविषयी माहिती दिलीय.

प्राजक्ताचं पुण्यात घर

याशिवाय प्राजक्ताने काही दिवसांपुर्वी टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्राजक्ताने तिचं हक्काचं घर घेतल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.

प्राजक्ताने नुकत्याच एका यु ट्यूब शोमध्ये या गोष्टीचा खुलासा केलाय. प्राजक्ताने पुण्यात घर घेतलंय. एका टॉवरमध्ये १७ व्या मजल्यावर प्राजक्ताने हे घर बुक केलंय. प्राजक्ताने रजिस्ट्रेशन आणि इतर कागदपत्रांची पूर्तता केलीय.

फॅन्सनी दिल्या शुभेच्छा

प्राजक्ता नवीन टॉवरचं जे बांधकाम होतंय त्याचं कन्स्ट्रक्शन आणि इमारतीचा प्रशस्त आवार खुप आवडलाय. त्यामुळे नवीन घराच्या जागेविषयी प्राजक्ता खूप आनंदी आहे.

प्राजक्ताने नवीन घराविषयी इतकी उत्सुक आहे कि तिने नावाची सुंदर पाटी सुद्धा बनवून घेतलीय. काहीच दिवसांपूर्वी प्राजक्ताने नेमप्लेटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. प्राजक्ताने सर्व फॉर्मलीटी पूर्ण केल्या असून तिला २ वर्षांनी घराचा ताबा मिळणार आहे.

आता प्राजक्ताने कर्जतला स्वतःचं हक्काचं आलिशान घर घेतलंय. एकुणच आधी पुणे आणि आता कर्जतला प्राजुने घर घेतलंय. सर्वांनी प्राजक्ताला शुभेच्छा दिल्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar Beef Seized: 'जुन्नरला चार गाई व दोन टन गोमांस जप्त'; जुन्नर पोलिसांची धडक कारवाई

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT