prajakta mali, prajakta mali crush, prajakta mali boyfriend, SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: आई हाच तुझा जावई...! या मराठी अभिनेत्याच्या आकंठ प्रेमात होती प्राजक्ता माळी

बोलता बोलता प्राजक्ताने तिच्या मराठी इंडस्ट्रीतल्या क्रश बद्दल खुलासा केलाय

Devendra Jadhav

Prajakta Mali News: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या 'पटलं तर घ्या' या चॅट शोमुळे चर्चेत आहे. प्लॅनेट मराठी वरील या चॅट शो मध्ये प्राजक्ता माळीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टींवर खुलासा केलाय.

या चॅट शोमध्ये प्राजक्ता सोबत अभिनेत्री ऋतुजा बागवे सहभागी होती. यावेळी बोलता बोलता प्राजक्ताने तिच्या मराठी इंडस्ट्रीतल्या क्रश बद्दल खुलासा केलाय.

(Prajakta Mali was in love with this Marathi actor)

प्राजक्ता माळी गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. प्राजक्ताला मराठी इंडस्ट्रीतील एक अभिनेता इतका आवडायचा कि त्याच्याशी लग्न करून माळी कुटुंबासाठी जावई आणण्याचा प्राजक्ताचा विचार होता. प्राजक्ताने बिनधास्तपणे तिला मराठी इंडस्ट्रीतील कोण अभिनेता आवडायचा ते सांगितलं आहे.

प्राजक्ता म्हणाली.."वैभव तत्ववादी माझा क्रश होता. कॉफी आणि बरंच काही नंतर मी आईला विचारलं होतं कि आई चालेल का तुला हा जावई म्हणून.." असा खुलासा प्राजक्ता माळीने केला. वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे यांचा कॉफी आणि बरंच काही सिनेमा प्रचंड गाजला.

चॉकलेट बॉय म्हणून वैभवची वेगळी ओळख निर्माण झाली. याच वैभववर प्राजक्ता माळी फिदा होती.

याशिवाय 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात प्राजक्ताला ,'तू पुढच्या वर्षी लग्न करतेयस',असं ऐकलंय म्हटल्यावर.. ती पटकन उत्तरली..''हे तर मी दरवर्षी बोलते''.

पण लागलीच तिनं आपण लग्न करणार..आणि मुलगा अमराठी-मराठी माहित नाही पण जरी अमराठी असला तरी त्याला मराठमोळं बनवेन असं म्हणत आगळावेगळा खुलासा केला.

मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. लोकप्रिय अभिनेत्री, डान्सर, याशिवाय महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोची निवेदिका प्राजक्ता माळी हिचं प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

तिचा सिनेमा असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडी, ती सतत प्रकाशझोतात असते. नुकतच तिने प्राजक्तराज हा तिचा ज्वेलरी ब्रॅण्डही सुरु केला आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'युवा पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

Yerawada Fire Station Darkness : येरवड्यातील अग्निशमाक केंद्र अंधारात; चार दिवसांपासून वीज पुरवठा बंद

SCROLL FOR NEXT