Prakash Raj, Kiccha sudeep Esakal
मनोरंजन

Prakash Raj: किच्चा सुदीपच्या भाजपा पाठिंब्यानं अभिनेता प्रकाश राज सुन्न.. म्हणाले..

कन्नड स्टार किच्चा सुदीपनं ५ एप्रिल,२०२३ रोजी आपण कर्नाटक विधानसभा निवडणुका दरम्यान भाजपाचा प्रचार करणार आहोत अशी अधिकृत घोषणा केली होती.

प्रणाली मोरे

Prakash Raj: कन्नड स्टार किच्चा सुदीपनं अखेर घोषणा केली की तो कर्नाटक विधानसभा निवडणुकां दरम्यान भाजपाचा प्रचार करणार आहे. त्यानं बुधवारी ५ एप्रिल रोजी घोषणा करत सांगितलं की तो मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पाठिंबा देणार आहे. पण ही बातमी समोर येताच साऊथ आणि बॉलीवूड अभिनेता प्रकाश राज यांना मात्र धक्का बसला आहे. किच्चा सुदीपच्या या निर्णयावर प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चला जाणून घेऊया प्रकाश राज यावर काय म्हणालेयत ते..

प्रकाश राज यांनी एका मुलाखतीत सांगितलं की,''किच्चा सुदीपच्या वक्तव्यानं मी खुप दुखावलो आहे आणि हैराण देखील झालो आहे''.

याआधी प्रकाश राजनी एक ट्वीट करत किच्चा सुदीपच्या भाजपात प्रवेश करण्याच्या बातम्यांवर रिअॅक्ट करत म्हटलं होतं की,''मला विश्वास आहे की हे सगळं खोटं आहे. अभिनेता किच्चा सुदीप भाजपात जाणार नाही. तो खूप हुशार माणूस आहे,तो असं कधीच बोलणार नाही. तो सहज कोणाच्याही बोलण्याला भुलणारा माणूस नाही''. (Prakash Raj shocked to kiccha sudeep support bjp in karnataka election)

पण आता जेव्हा किच्चा सुदीपनं ऑफिशियली तो भाजपाचा प्रचार करणार आहे हे सांगितलं तेव्हा मात्र प्रकाश राज दुखावलेयत. त्यांनी यावर प्रतिक्रिया देत हे स्पष्ट केलं की ते किच्चा सुदीपवर नाराज आहेत.

माहितीसाठी इथं सांगतो की भाजपाला पाठिंबा देण्याची घोषणा करण्याआधी किच्चा सुदीपला धमकी देणारं पत्र देखील मिळालं होतं.

हेही वाचा: सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

बुधवारी ५ एप्रिल रोजी किच्चा सुदीप आणि त्याच्या मॅनेजरला धमकी मिळाली होती. त्यानं तसं ऑफिशियली स्टेटमेंट जारी केलं होतं.

तो म्हणाला होता, ''हो,मला धमकी मिळाली होती की ते माझे प्रायव्हेट व्हिडीओ लीक करतील. मला माहित आहे की ते फिल्म इंडस्ट्रीपैकीच आहेत. आणि मी याचं चोख उत्तर देईन''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT