prasad oak, manjiri oak, prasad oak love story SAKAL
मनोरंजन

Prasad Oak Birthday: लग्नाआधीच झालेले एकमेकांचे नवरा - बायको..! अशी आहे प्रसाद - मंजिरीची प्रेमकहाणी

प्रसादच्या करियरमध्ये त्याची बायको मंजिरी हिचा फार मोठा वाटा आहे.

Devendra Jadhav

Prasad Oak - Manjiri Oak Love Story: आज मराठी इंडस्त्रातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओकचा वाढदिवस. धर्मवीर सिनेमातून प्रसाद ओकने अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

प्रसादच्या आजवरच्या करियरमध्ये त्याची बायको मंजिरी हिचा फार मोठा वाटा आहे. प्रसाद आणि मंजिरी या दोघांची जोडी मराठी इंडस्ट्रीत कायम चर्चेत असते.

प्रसाद ओकच्या वाढदिवसानिमित्त मंजू आणि प्रसाद या दोघांची लव्हस्टोरी पाहूया..

(prasad oak and manjiri oak love story )

प्रसाद पुण्याच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC) मध्ये शिकत होता. प्रसाद कॉलेजमध्ये शिकत असताना अभिनयाचं वर्कशॉप घ्यायचा.

या वर्कशॉपमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. मंजिरी सुद्धा त्या काळात अभिनय करायची. काहीतरी शिकायला मिळेल, आणि पुढे एकांकिकेत काम मिळेल या भावनेने मंजिरीने सुद्धा प्रसादच्या वर्कशॉप मध्ये भाग घेतला होता.

प्रसादने त्याच्या वर्कशॉपमध्ये पाच एकांकिका बसवल्या. या एकांकिकेत प्रसादने त्याच्या वर्कशॉपमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना अभिनयाची संधी दिली. पण मंजिरीला मात्र कोणत्याही एकांकिकेत घेतलं नव्हतं.

मंजिरीला नाटकात भूमिका साकारायची होती. पण प्रसादने मात्र अजूनही तिला संधी दिली नव्हती. आणि अशातच प्रसादला एका दिवाळी अंकात क्रॉस कनेक्शन हि एकांकिका सापडली.

क्रॉस कनेक्शन हि एकांकिका धम्माल कॉमेडी होती. त्यात नवरा बायकोची गोष्ट होती. बायकोच्या भूमिकेसाठी प्रसादने मंजिरीची निवड केली. पण नवऱ्याच्या भूमिकेत प्रसादला कोणीही अभिनेता सापडत नव्हतं.

मग काय..! प्रसादने स्वतःच नवऱ्याची भूमिका करायचं ठरवलं. रिहर्सल सुरु झाल्या.. नाटकानिमित्ताने भेटीगाठी वाढल्या.. आणि नाटकात नवरा बायको झालेले प्रसाद मंजिरी खऱ्या आयुष्यात सुद्धा एकमेकांचे जोडीदार बनले.

२०२२ झालेल्या सुपरहिट झालेल्या धर्मवीर सिनेमाचा पुढचा भाग म्हणजेच धर्मवीर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद ओक पुन्हा एकदा धर्मवीर २ मधून आनंद दिघेंची भूमिका साकारणार आहे.

धर्मवीर सिनेमात प्रसाद ओकने साकारलेल्या आनंद दिघेंच्या भूमिकेमुळे त्याला कमालीची लोकप्रियता मिळाली आणि त्याच्यावर पुरस्करांचा वर्षाव झाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT