prashant damle wins in Natya Parishad Election Result 2023 prasad kambli defeat sakal
मनोरंजन

Prashant Damle : प्रशांत दामले यांना 'ब्राह्मण भूषण' पुरस्कार जाहीर

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे त्यांना डी. लिट पदवी मिळाली आहे, या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार जाहीर करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

Prashant Damle marathi actor entertainment bramhan bhushan : मराठी नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असल्याचे दिसून येते. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दामले यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्यांची कारकीर्द ही नेहमीच प्रेक्षकांच्या कौतूकाचा विषय ठरली आहे.

यासगळ्यात प्रशांत दामले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आम्ही सारे ब्राह्मण व ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा ब्राह्मण भूषण पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती मुख्य संपादक या नियकालिकेचे संपादक भालचंद्र कुलकर्णी, संचालक संजय ओर्पे यांनी दिली आहे. व्यावसायिक नाटकांच्या 12 हजार पाचशेंहून अधिक प्रयोगांचा टप्पा पार केलेले विश्वविक्रमवीर अभिनेते प्रशांत दामले यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे त्यांना डी. लिट पदवी मिळाली आहे, या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार जाहीर करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मानपत्र, पुणेरी पगडी व उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या समारंभामध्ये प्रसिद्ध मुलाखतकार राजेश दामले हे प्रशांत दामले यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

येत्या शनिवार, दि. 6 मे 2023 रोजी सायं. 5.30 वाजता मॉडर्न कॉलेज सभाग़ृह, शिवाजीनगर येथे होणार्या या समारंभात इंदुमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार साहित्यिक व पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांना, डॉ. रामचंद्र देखणे युवा कीर्तनकार पुरस्कार मानसी बडवे यांना आणि भगवान परशुराम ब्राह्मण संस्था पुरस्कार देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे या शतकमहोत्सवी संस्थेला देण्यात येणार आहे.

रोख बक्षिस, शाल व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण चितळे (अध्यक्ष, महाराष्ट्र चित्पावन संघ) तर डॉ. गजानन एकबोटे (कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी) हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी श्रीमती अपर्णाताई रामतीर्थकर (2013), अ.भा. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. गोविंद कुलकर्णी (2014), एअर मार्शल भूषण गोखले (2015), पं. वसंतराव गाडगीळ (2016), पितांबरीचे श्री. रविंद्र प्रभुदेसाई (2017), पौरोहित्यांचे संघटन करणार्या श्रीसद्गुरु ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कुलकर्णी (2018), सुप्रसिद्ध प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे (2019) आणि ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (2022) यांना ब्राह्मण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT