prathamesh parab, kshitija ghosalkar  esakal
मनोरंजन

Prathamesh Parab: प्रथमेशच्या बायकोचा खास उखाणा; क्षितिजानं शेअर केला व्हिडीओ

Prathamesh Parab: क्षितिजानं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती खास उखाणा घेताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Prathamesh Parab: अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि क्षितिजा घोसाळकर (Kshitija Ghosalkar) यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशताच आता क्षितिजानं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती खास उखाणा घेताना दिसत आहे.

क्षितिजानं शेअर केला व्हिडीओ

क्षितिजानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सासरी गृहप्रवेश करताना खास उखाणा घेताना दिसत आहे. या व्हिडीओला क्षितिजानं कॅप्शन दिलं, "अहोंसाठीचा उखाणा" क्षितिजाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. क्षितिजानं तिच्या उखाण्यात प्रथमेशच्या चित्रपटांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

क्षितिजाचा उखाणा:

'हृदयी वसंत फुलताना' वाढला होता थोडासा 'बीपी'

'डॉक्टर डॉक्टर' बोलावले तेव्हा कुठे स्थिर झाला आयुष्याचा डीपी

प्रेम आमचं खरंय, नाही थिल्लर 'टाईमपास'

प्रेमाच्या परीक्षेत दोघांनी मिळवले 100 टक्के नाही झालं कोणी 35 टक्के काठावर पास'

जोडी आमची 'टकाटक' आहे एक नंबर

'खिचीक खिचीक' करत लोकंही काढतात फोटो शंभर

'ढीशक्याव' धूमधडाक्यात पडला होता पार साखरपुडा

मेहंदीच्या दिवशी 'डिलिव्हरी बॉय'ने आणून दिला सौभाग्याचं चुडा

लग्नही झालं आज थाटामाटात झालो आम्ही 'उर्फी'

आयुष्यभर एकमेकांना भरवू आनंदाने बर्फी

आता महत्वाचं प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टरची प्रेक्षकांच्या मनावर आहे गोड जरब

आता माझीही नव्याने ओळख करून देते सौ. क्षितिजा प्रथमेश परब.

पाहा व्हिडीओ:

क्षितिजानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती जांभळ्या रंगाच्या वनपीसमध्ये दिसत आहे. तर प्रथमेश हा ब्लॅक आऊटफिमध्ये दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT