Pravin Tarde marathi actor producer director supports tomato price hike
Pravin Tarde marathi actor producer director supports tomato price hike SAKAL
मनोरंजन

Pravin Tarde: ईथे वर्षभर शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, टोमॅटो भाववाढीचं प्रवीण तरडेंनी केलं समर्थन

Devendra Jadhav

Pravin Tarde on Tomato Price Hike News: सध्या टोमॅटो भाववाढीची सगळीकडे एकच चर्चा आहे. भाजी मंडईत टोमॅटोचे भाव प्रति किलोस ५० रुपयांपर्यंत वाढल्याने टोमॅटोची लाली वाढली आहे.

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचा भाव 140 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे, काही दिवसांपूर्वी जो टोमॅटो 20 रुपये किलोने मिळत होता तो आता 140 रुपयांना मिळतोय.

महाराष्ट्रातील नाशिक, जुन्नर, पुणे येथून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना, काही दिवसांतच अवकाळी पाऊस व राजस्थान बीपर जॉय या चक्रीवादळामुळे पिकाचे नुकसान झाल्याने यंदा टोमॅटोचे भाव गगनाला भिडला.. अशातच प्रसिद्ध लेखक - दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी टोमॅटो भाववाढीवर खरमरीत पोस्ट लिहीली आहे.

(Pravin Tarde marathi actor producer director supports tomato price hike )

प्रवीण तरडे विविध विषयांवर त्यांची परखड मतं व्यक्त करत असतात. अशातच प्रवीण तरडेंनी टोमॅटो भाववाढीवर त्यांचं मत सोशल मिडीयावर व्यक्त केलंय.

प्रवीण तरडे लिहीतात... दोन दिवस टोमॅटो महाग झालाय तर मिडीयात लईच आग लागलीये.. ईथे वर्षभर भाव मिळत नाही म्हणुन सडून जातो तेंव्हा सगळे गप्पगार.. #लाल चिखल अशी पोस्ट प्रवीण तरडेंनी लिहीलीय.

दरम्यान प्रवीण तरडेंच्या या पोस्टखाली अनेक शेतकऱ्यांनी कमेंट करुन समर्थन दिलंय. "सद्या आमचा अर्धा ऐकर टमाटर आहे ...चांगले पैसे मिळत आहेत",

"शेतकऱ्याला जेमतेम 25 रु किलोला भाव मिळत आहे शहरात 120 रु किलो,मधलेच मजा करतात",

"तरडे सर आपण चांगला विषय शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय हाती घेतला धन्यवाद मनापासून आभार", अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रवीण तरडेंच्या पोस्टचं समर्थन केलंय.

दरम्यान मागणी वाढल्याने टोमॅटो मार्केट मध्ये गायब झाले आहेत. त्यातच टोमॅटो मार्केटमध्ये भेटत नसल्याने घरात स्वयंपाक करत असलेल्या गृहिणीमध्ये नाराजी दिसत आहे.

महागाईचा फटका सर्वसामान्य माणसांना बसतोय, असं चित्र आहे. प्रवीण तरडेंच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ते लवकरच आणीबाणी या मराठी सिनेमात अभिनय करताना दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT