Kamakhya Devi:  Preity Zinta
मनोरंजन

Kamakhya Devi: शिंदे गटापाठोपाठ आता बॉलीवूडमध्ये कामाख्या देवीची क्रेझ, प्रीती पोहचली गुवाहाटीला

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने चित्रपटसृष्टीत ९०चा काळ चांगलाच गाजवला. बऱ्याच काळापासून ती मोठ्या पडद्यापासून दूर असली, तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहत चाहत्यांशी संपर्कात असते.

आयुष्यातील बऱ्याच लहान-मोठ्या गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रीतीने नुकतेच गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

याचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रीतीने गुलाबी रंगाचा पंजाबी सूट परिधान केला असून, डोके ओढणीने झाकले आहे. चेहऱ्यावर मास्कही घातला होता. प्रीतीने या क्लिपमध्ये मंदिर आणि त्या मंदिराजवळपासची दुकाने; तसेच तलावाची झलकही दाखवली.

व्हिडिओ शेअर करताना प्रीतीने लिहिले, “गुवाहाटीला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराला भेट देणे. आमच्या फ्लाइटला बराच उशीर झाला. त्यामुळे मी रात्रभर जागी होते; पण मंदिरात प्रवेश केला, तेव्हा सर्व सार्थकी लागल्याचे वाटले. या मंदिरात येऊन मनाला शांतता आणि सकारात्मक विचार करण्याची शक्ती मिळाली. तुमच्यापैकी कुणी गुवाहाटीला आलात, तर नक्कीच या मंदिराला भेट द्या”.

सांगा की प्रीती तिचा पती जीन गुडइनफसोबत यूएसमध्ये राहते. त्यांनी 29 फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजेलिसमध्ये लग्न केले. दोघे 2021 मध्ये जय आणि जिया या जुळ्या मुलांचे पालक झाले. सरोगसीद्वारे मुलांचा जन्म झाल्याची घोषणा करत प्रीतीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

सांगा की प्रीती तिचा पती जीन गुडइनफसोबत यूएसमध्ये राहते. त्यांनी 29 फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजेलिसमध्ये लग्न केले. दोघे 2021 मध्ये जय आणि जिया या जुळ्या मुलांचे पालक झाले. सरोगसीद्वारे मुलांचा जन्म झाल्याची घोषणा करत प्रीतीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT