Prem Chopra reacts to death rumours, says ‘Rakesh Roshan called’ him to ask if he's alive Google
मनोरंजन

Prem Chopra:'माझ्या मृत्यूनं कोणाला आनंद',निधनाच्या अफवेवर अभिनेत्याचा सवाल

सोशल मीडियावर प्रेम चोप्रा यांच्या निधनाची अफवा पसरल्यानंतर राकेश रोशनपासून अनेक बॉलीवूडकरांनी त्यांना फोन,मेसेजेस करुन चौकशी केली.

प्रणाली मोरे

सोशल मीडिया कधी कोणाला मारेल अन् मेलेल्याला जिवंत करेल याचा काही नेम नाही. या सोशल मीडियामुळे अफवांना पसरायला फार वेळ लागत नाही. आणि यामुळे कोणाच्याही निधनाच्या बातमीवर देखील लोक लगेच विश्वास ठेवतात. बॉलीवूडचे खलनायक ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा (Prem Chopra) यांच्याविषयी देखील अशीच मोठी अफवा सोशल मीडियामुळे वेगात व्हायरल झाली. यानंतर त्यांना सारखे फोन आणि मेसेजेस यायला लागले. लोकांना फक्त जाणून घ्यायचं होतं की,ते जिवंत आहेत का? बॉलीवूड सेलिब्रिटीं बाबतीत तर अशा अफवा लवकर पसरतात.(Prem Chopra reacts to death rumours, says ‘Rakesh Roshan called’ him to ask if he's alive)

प्रेम चोप्रा यांनी आता समोर येऊन त्यांच्याविषयी पसरलेल्या अफवेला ब्रेक लावला आहे. एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले आहेत की, मी ठीक आहे,मला काहीही झाले नाही. ही खूपच दुःखदायक गोष्ट आहे आणि मी काय बोलणार. कोणाला माझ्या मृत्यूच्या बातमीनं मानसिक आनंद मिळतोय कोण जाणे. पण मी ठीक आहे,तुमच्याशी बोलतोय,माझं आरोग्य उत्तम आहे.

पुढे ते म्हणाले, माहित नाही,सकाळपासून किती कॉल आले मी जिवंत आहे की नाही हे पाहण्यासाठी. राकेश रोशनने देखील मला कॉल केला. ट्रेड अॅनलिस्ट अमोद मेहराचा फोन आला. मी हैराण आहे कोणी असं का केलं असेल. असंच माझा जवळचा मित्र जितेंद्र सोबत कुणीतरी केलं होतं. हे चार महिने आधी झालं होतं. हे आता थांबायला हवं.

प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांना या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात कोरोनाची बाधा झाली होती. दोघांनाही मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

प्रेम चोप्रा ८६ वर्षाचे आहेत. त्यांनी करिअरच्या ६० वर्षात ३८० सिनेमे केले. बहुतांशी सिनेमात त्यांनी खलनायकच साकारला. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९३५ साली लाहोर मध्ये झाला होता. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर ते भारतात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने भारताची चिंता वाढली! सेमीफायनलमधील शेवटच्या जागेसाठी न्यूझीलंडशी शर्यत; पाहा समीकरण

INDW vs ENGW: इंग्लंडविरुद्ध सामना कुठे फिरला, ज्यामुळे भारताचा झाला ४ धावांनी पराभव, हरमनप्रीत कौरने बोलून दाखवली मनातलं दु:ख

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT