Prince Narula and Rhea chkraborty clashed on the sets of roadies Esakal
मनोरंजन

Rhea chkraborty: 'रोडीज १९' च्या सेटवर आपसात भिडले रिया आणि प्रिन्स नरुला.. धमकी देण्यापर्यंत पोहोचलं भांडण..

रोडीज १९ या शो च्या माध्यमातून रिया छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. बोललं जात आहे की या शो मध्ये ती परिक्षकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

प्रणाली मोरे

Rhea chkraborty: टी.व्ही वरचा सर्वात चर्चेत असलेला रिअॅलिटी शो रोडीज सिझन १९ गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. या शो चा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. या शो मध्ये रिया चक्रवर्ती देखील दिसणार आहे. 'रोडीज १९' च्या माध्यमातून रिया छोट्या प़डद्यावर एन्ट्री करत आहे.

बोललं जात आहे की या शो मध्ये ती परिक्षकेच्या भूमिकेत दिसणार आहे. आता बातमी समोर आली आहे ती रियाच्या एका वादाची. अभिनेत्रीनं शोचा दुसरा परिक्षक प्रिन्स नरुलावर हैराण करणारा आरोप केला आहे.(Prince Narula and rhea chkraborty clashed on the sets of roadies)

मीडिया रिपोर्टनुसार,आपल्याशी बोलताना प्रिन्सनं चुकीच्या शब्दांचा वापर केला तसंच आपल्याला धमकी दिल्याचा आरोप रियानं केला आहे. रियानं प्रिन्सच्या विरोधात शो च्या टीमकडे तक्रार केल्याचं देखील समोर येत आहे.

या संपूर्ण वादानंतर प्रिन्स शो चं शूट सोडून निघून गेल्याचं वृत्त आहे. याआधी रियाचं गौतमसोबत देखील वाद झाला होता पण दोघांनी आपसांत हे भांडण मिटवलं होतं. पण प्रिन्स-रियाच्या वादा संदर्भात शो च्या मेकर्सकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

जेव्हापासून रिया चक्रवर्ती या शो ची परिक्षक बनल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या तेव्हापासून सुशांतचे चाहते नाराज झाल्याचं समोर आलं होतं. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रियाला अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे.

एका नेटकऱ्यानं लिहिलं होतं की,'रोडीजचे एवढे वाईट दिवस आले की रियाला त्यांनी घेतलं'. तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं होतं की,'हे मला मुळीच आवडलं नाही'. सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये रियाचं नाव समोर आल्यानंतर खरंतर गौतम आणि प्रिन्स दोघांनी रियाला पाठिंबा दिला होता. तरी तिनं दोघांशी पंगा घेतल्यानं सगळेच हैराण झालेयत.

नुकतीच या शो च्या ऑडिशनला दिल्लीत सुरुवात झाली. ज्यामध्ये रोडीज गॅंगच्या लीडरच्या भूमिकेत दिसणारी रिया चक्रवर्ती देखील सामिल झाली होती. आता पहायचं की रिया प्रिन्ससोबतच्या तिच्या भांडणावर काय प्रतिक्रिया देते की बोलणं टाळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबेहरा येथील जाबलीपुरा फळ बाजारात फळ उत्पादकांच्या आंदोलनात सहभाग घेतला

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT