Sapna Gill Esakal
मनोरंजन

Sapna Gill: पृथ्वी शॉला नडणारी सपना गिल आहे तरी कोण? पुरस्काराने आहे सन्मानित

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत सपना गिलच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताच सपनाला अटक करण्यात आली आहे. पण ती कोण माहितेय का?

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या त्याच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. बुधवारी, 15 फेब्रुवारी रोजी मुंबईतील सांताक्रूझ भागातील एका हॉटेलबाहेर काही त्याचा आणि तरुणीमध्ये वाद झाला. लोकांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या गाडीवर हल्लाही केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी पृथ्वीसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. ती पृथ्वीला मारण्याचा प्रयत्न करत आहे. ही मुलगी दुसरी कोण आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. ती मुलगी ही सोशल मिडियावरील प्रसिद्ध चेहरा आहे. तिचं नावं सपना गिल आहे. सपनाने केवळ सोशल मीडियावरच नव्हे तर चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सपना ही एक भोजपुरी अभिनेत्री आहे. तिने रवि किशन आणि निरहुआ दिनेश लाल यादव, खेसारी आणि पवन सिंह सारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.

सपना गिलने 2019 मध्ये भोजपुरी चित्रपट 'काशी अमरनाथ'मधून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात सपना व्यतिरिक्त रवी किशन, आम्रपाली दुबे आणि निरहुआ मुख्य भूमिकेत होते.

सपनाचे इंस्टाग्रामवर 2,19,000 फॉलोअर्स आहेत. मूळ चंदिगडची असलेली सपना सध्या मुंबईत राहते. ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मनोरंजन आणि डान्स व्हिडिओंपासून फॅशन आणि फोटोंपर्यंतचे कटेंट अपलोड करते.

Sapna Gill
Sapna Gill

सपना गिलने 'काशी अमरनाथ', 'निरहुआ चलल लंदन' आणि 'मेरा वतन' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिला सबरंग 2018 मधील काशी अमरनाथ या चित्रपटासाठी बेस्ट डेब्यू फिमेल अभिनेत्रींचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT