priya malik  Team esakal
मनोरंजन

प्रिया मलिकच्या विजयावर सनी पाजीचं ट्विट व्हायरल

वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (mirabai chanu) टोकियो ऑलिम्पिकमध्ये (tokiyo olympic 2020) पहिल्याच दिवशी रौप्य पदकाची कमाई केली.

युगंधर ताजणे

मुंबई - वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (mirabai chanu) टोकियो ऑलिम्पिकमध्ये (tokiyo olympic 2020) पहिल्याच दिवशी रौप्य पदकाची कमाई केली. त्यामुळे तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. सोशल मीडियातून तिला प्रचंड शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर भारताचं नाव साता समुद्रापार नेणाऱ्या प्रिया मलिकवर देखील कौतूकाचा वर्षाव होत आहे. तिनंही कुस्ती स्पर्धेत मोठं यश संपादन केलं आहे. तिनं हंगेरीमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत यश मिळवत गोल्ड मेडल प्राप्त केलं आहे. त्यामुळे तिच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. काहींनी तर प्रियानं ऑलिम्पिकमध्येच यश मिळवलं आहे. अशा आशयाच्या पोस्टही शेयर केल्या आहेत. (priya malik wins gold medal sunny deol tweet goes viral on it yst88)

बॉलीवूड सेलिब्रेटींनी देखील तिचं कौतूक केलं आहे. यासगळ्यात बॉलीवूड अभिनेता आणि खासदार सनी देओलनंही प्रियाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं व्टिट करुन तिचं कौतूक केलं आहे. सनीनं आपल्या ट्विट्मध्ये लिहिलं आहे की, आणखी एक दिवस, आणखी एक विजय. प्रिया आम्हाला तुझा हेवा वाटतो. सनीनं अशाप्रकारे प्रियाला शुभेच्छा दिल्या आहेत. सनीच्या त्या व्टिटला मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.

शनिवारी सनीनं मीराबाई चानुला देखील व्टिट करुन शुभेच्छा दिल्या होत्या. तिनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवले. त्यानंतर संबंध देशभरातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव झाल्याचे दिसुन आले. प्रियानं 73 किलो वजनी गटात बेलारुसच्या महिला पहिलवानाचा 5-0 असा पराभव केला. प्रिया ही हरियाणातील जिंद या गावची राहणारी आहे.

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर: सिव्हिल हॉस्पिटलमधील किमोथेरपी सेंटर अद्याप बंदच

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

Solapur politics: अजय दासरींनी युवती सेनेत लुडबूड करू नये: शिवसेना ठाकरे युवती सेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, पक्षात राहूनच पक्षाशी गद्दारी!

SCROLL FOR NEXT