Priyanka chopra husband nick Jonas Team esakal
मनोरंजन

प्रियांका चोप्रा झाली आई; चाहत्यांना दिली 'गुड न्यूज'

प्रियांका-निकचं हे पहिलं अपत्य आहे.

स्वाती वेमूल

बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) शुक्रवारी चाहत्यांना गुड न्यूज दिली. प्रियांका आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोघांनीही ही आनंदाची बातमी सांगितली. सरोगसीद्वारे प्रियांका-निकने बाळाला जन्म दिला. 'सरोगसीद्वारे आमच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे', असं प्रियांका आणि निकने त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याचप्रमाणे हे क्षण आमच्यासाठी अत्यंत खास असून आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

प्रियांकाच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टला अवघ्या ९ तासांत १५ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. केविन आणि जो या निकच्या दोन भावांनीही त्यावर हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. प्रियांकाच्या आधीही बॉलिवूडमधल्या काही अभिनेत्रींनी सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिला. शाहरुख खान-गौरी, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, आमिर खान-किरण राव, तुषार कपूर, एकता कपूर, करण जोहर, सनी लिओनी-डॅनिअल, प्रिती झिंटा-झिन या सेलिब्रिटींचा त्यामध्ये समावेश आहे.

२०१७ मध्ये 'मेट गाला'मध्ये एकत्र हजेरी लावल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने त्यांचं नातं जगजाहीर केलं. वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर दोघं लग्नबंधनात अडकले. या दोघांनी १ डिसेंबर २०१८ रोजी राजस्थानमध्ये लग्न केलं. प्रियांकाला प्रपोजल रिंग घेण्यासाठी निकने लंडनमधील नामांकित ज्वेलरीचं दुकान बंद करायला लावलं होतं. त्यानंतर निकने प्रियांकाला तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी फिरायला गेले असताना प्रपोज केलं.

सरोगसी म्हणजे काय?

सरोगसीमध्ये आई-वडील होऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्यापैकी पुरुषाचं स्पर्म बाळाला जन्म देणाऱ्या महिलेच्या एग्ग्ससोबत मॅच केलं जातं. दाम्पत्याचे स्पर्म आणि एग्स टेस्ट ट्यूबमध्ये मिसळून बाळाला जन्म देणाऱ्या महिलेच्या गर्भाशयात इन्सर्ट करण्यात येतात. त्यामुळे बाळाला प्रत्यक्ष जन्म देणारी महिला वेगळी असते. या महिलेला 'सरोगेट मदर' असं म्हटलं जातं. सरोगसीमध्ये ज्यांना मूल हवं आहे अशा दाम्पत्यात आणि सरोगेट मदरमध्ये एक करार केला जातो. ज्यानुसार मूल जन्माला आल्यानंतर त्या बाळाचं पालकत्व त्या दाम्पत्याचं असतं. मात्र मूल होतपर्यंत संपूर्ण ९ महिने सरोगेट मदरची काळजी घेण्याची जबाबदारी त्या दाम्पत्याची असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke Apologises : "मी माफी मागतो..."; CJP प्रमुख अभिजित दीपके यांनी आंदोलकांना असे का म्हटले?

Raju Shetti Detained Delhi Police : राजू शेट्टी, दिल्ली पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक; दिल्लीत पोहोचताच राजू शेट्टी, महादेव जानकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Live Updates Marathi : भाजप आमदार सदाभाऊ खोतांकडून आंदोलकांना आतंकवाद्यांची उपमा

'चक दे! इंडिया' चित्रपट पाहून हॉकी खेळण्याची प्रेरणा... साताऱ्याचा आदित्य ललागे वर्ल्ड कप संघात; पाकिस्तानला पाणी पाजण्यासाठी सज्ज

पालघरमध्ये दिवसाढवळ्या दरोडा! बंदुकीचा धाक दाखवत सोनाराचं दुकान लुटलं, लाखो रुपयांचे दागिने घेऊन लंपास; Video Viral

SCROLL FOR NEXT