Priyanka Chopra Daughter Sakal
मनोरंजन

Priyanka Chopra Daughter : 'देसी गर्ल' प्रियांकाच्या पोरीची पहिली झलक! नेटकऱ्यांकडून कमेंटचा पाऊस

प्रियांकाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सरोगसीद्वारे मालती मेरी चोप्राला जन्म दिला.

सकाळ डिजिटल टीम

Priyanka Chopra-Malti Marie Pics : बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्राची मुलगी मालती मेरी पहिली झलक अखेर समोर आली आहे.

प्रियांका चोप्रा आणि मालती मेरी चोप्रा यांचे हे फोटो निक जोनासच्या हॉलीवूड वॉक ऑफ फेम स्टार इव्हेंटमधील असून, प्रियांका आणि मालती मेरी चोप्राच्या या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 मध्ये जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये ख्रिश्चन आणि हिंदू परंपरेनुसार लग्न केले होते. त्यानंतर प्रियांकाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सरोगसीद्वारे मालती मेरी चोप्राला जन्म दिला.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रियांकाच्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी करोडो चाहते आस लावून होते.अखेर आता मालती मेरी चोप्राची पहिली झलक समोर आली आहे. सध्या या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट करत आहेत.

प्रियांका आगामी काळात 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' या चित्रपटामधून आणि सिटाडेल या वेब सीरिजमधून प्रियांका ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे.

याशिवाय प्रियांका फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटांमध्येदेखील मुख्य भूमिका साकारणार आहे. प्रियांकाना याआधी बाजीराव मस्तानी, दिल धडकने दो, डॉन-2, मेरी कोम, बर्फी, द स्काय इज पिंक या चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT