Priyanka Chopra and Preity Zinta Google
मनोरंजन

Priyanka Chopra च्या चारित्र्यावरच घाला होता तो..12 वर्षापूर्वी असं काय बोललेली प्रीती?

प्रीती झिंटानं एका मुलाखतीत प्रियंका चोप्राला अशा शब्दात हिणवलं होतं की त्यामुळे अख्ख्या बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती.

प्रणाली मोरे

Priyanka Chopra and Preity Zinta: बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींमधील कॅटफाइट्स आणि भांडणं हे आता सर्वप्रचलित आहे. ७० आणि ८० च्या दशकात अभिनेत्रींमध्ये तू-तू मै-मै जोरदार रंगायचं. आता देखील अधनंमधनं या रुसव्या-फुगव्यांच्या बातम्या कानावर पडतच असतात.

पण आता अधिककरुन कॅट फाइटपेक्षा विवाहबाह्य संबंध आणि लिंक अप्सच्या बातम्या कानावर जास्त पडतात. (Priyanka Chopra is home breaker... Preity zinta apparently called in inteview)

विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक कलाकारांची घरं तुटलेली आपण पाहिली असतील पण त्यात काही कलाकारांनी मात्र वेळीच शहाणपणा दाखवत आपली चूक सुधारल्याच्या बातम्याही आपण ऐकल्या आहेत.

असंच काहीसं गौरी खान आणि शाहरुख खान यांच्या आयुष्यात झालं होतं. जेव्हा प्रियंका चोप्राचं नाव शाहरुख खान सोबत जोडलं गेलं होतं.

तेव्हा प्रीती झिंटानं प्रियंकाला 'घर तोडणारी..' म्हणून हिणवलं होतं. चला जाणून घेऊया बॉलीवूडच्या त्या खळबळजनक किस्स्याविषयी.

प्रीती झिंटाला तेव्हा प्रियंका चोप्रा आणि शाहरुख खान यांच्यातील कथित अफेअरविषयी प्रश्न विचारला गेला होता. तेव्हा प्रियंका चोप्राचं नाव न घेता प्रीतीनं 'घर तोडणारी ..' असं म्हटलं होतं. ही तेव्हाची गोष्ट जेव्हा शहरातील प्रत्येक गल्लीपर्यंत प्रियंका आणि शाहरुखच्या अफेअरच्या बातम्या पोहोचल्या होत्या. तेव्हा गौरी खान शाहरुखला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे अशा बातम्या देखील पसरल्या होत्या.

शाहरुख आणि प्रियंका चोप्रा चं नाव जोडलं गेलं ते वर्ष होतं २००६,जेव्हा ते दोघे 'डॉन' सिनेमा करत होते. या सिनेमानंतर २०११ मध्ये 'डॉन २' आला. आणि या दरम्यान काम करताना शाहरुख आणि प्रियंका अधिक जवळ आले असं म्हटलं जातं. माहितीनुसार,शाहरुख आणि प्रियंकामधील जवळीक एवढी वाढली की पाहणारे देखील हैराण व्हायचे. आणि हिच गोष्ट जेव्हा गौरी खानला समजली तेव्हा तिनं त्याचा धसका घेतला होता..असं त्यांच्या जवळच्या सूत्रांनी म्हटलं होतं.

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

बोललं जातं की तेव्हा गौरी खाननं शाहरुखला खडसावलं होतं की तो पुन्हा प्रियंकासोबत कुठल्या सिनेमात काम करणार नाही आणि तिच्यापासून लांब राहिल. अर्थात शाहरुख आणि प्रियंकात काही तरी सुरु होतं याचा पुरावा कधी कुणाला मिळाला नाही. शाहरुख किंवा प्रियंका दोघांनीही यावर बोलणं टाळलं.

गौरी खान आणि शाहरुख खानमध्ये मात्र तणाव निर्माण झाला होता. पण आपल्या लग्नाला वाचवण्यासाठी गौरी खाननं जो निर्णय घेतला त्याचं सगळ्यांनीच कौतूक केलं.

गौरीने शाहरुखला ठणकावून सांगितलं की तो पुन्हा कधीच प्रियंकासोबत काम करणार नाही. आणि तसं झालेलं दिसूनही आलं. दोघांनी पुन्हा 'डॉन २' नंतर कधीच एकत्र काम केलं नाही.

आणि याच शाहरुख-प्रियंकाच्या अफेअर विषयी जेव्हा प्रीती झिंटाला प्रश्न विचारला गेला होता तेव्हा ती थेट म्हणाली होती,''अशा महिलांप्रती बोलणं मी अनेकदा टाळते, ज्या दुसऱ्यांची घरं तोडतात. मला अशा अभिनेत्रींचा राग आहे ज्या टॉपला जाण्यासाठी अभिनेत्यांचा एखाद्या शिडीसारखा वापर करतात. ज्या नेहमीच बड्या अभिनेत्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात अशा अभिनेत्रींचा संताप येतो मला''.

प्रीती झिंटाच्या या विधानानं तेव्हा खळबळ उडवून दिली होती. लोक हैराण झाले होते कारण प्रीतीनं 'द हिरो- लव्ह स्टोरी ऑफ ए स्पाय' या सिनेमात प्रियंका चोप्रा सोबत काम केलं होतं.

आज प्रीती आणि प्रियंकामध्ये सगळं ठीक आहे. पण एक मात्र आहे २०११ ला 'डॉन २' मध्ये दिसलेले शाहरुख-प्रियंका पुन्हा सिनेमातून कधीच एकत्र दिसले नाहीत ,पण चाहते मात्र आजही त्यांना पडद्यावर एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

SCROLL FOR NEXT