priyanka chopra
priyanka chopra 
मनोरंजन

'देसी गर्ल'चं परदेशात भारतीय रेस्टॉरंट; सोशल मीडियावर फोटो व्हायरल 

सकाळ ऑनलाइन

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमाच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा पती निक जोनाससोबतचे व्हिडीओ आणि फोटो ती सोशल मीडिया शेअर करत असते. नुकताच प्रियांकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने  नव्या रेस्टॉरंटची माहिती दिली. या रेस्टॉरंटचे नाव 'सोना' आहे. रेस्टॉरंटचा फोटो शेअर करून प्रियांकाने फोटोला कॅप्शन दिले की, 'सोना हे नविन रेस्टॉरंट सुरू होणार आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. न्यूयॉर्कमधल्या या नवीन रेस्टॉरंटमध्ये भारतीय पद्धतीचे जेवण मिळणार आहे. डिझाइनर मेलिसा बॉवर्स आणि उर्वरित टीमचे आभार.' 

या पोस्टमधील दुसरा आणि तिसरा फोटो हा सप्टेंबर २०१९ मधला असल्याचं तिने सांगितलं. रेस्टॉरंटसाठी जागा घेतल्यानंतर त्याठिकाणी पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हाचे हे फोटो आहेत. प्रियांकाचा परदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 
 

प्रियांका नुकतीच 'द व्हाइट टायगर' या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यामध्ये तिच्यासोबत राजकुमार राव आणि आदर्श गौरव यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT